पेट्रोल-डिझेलवरील करामध्ये राज्यसरकारने कपात करावी ; वैजापूर शहर भाजपतर्फे निवेदन

वैजापूर ,२८ मे /प्रतिनिधी :- वैजापूर शहरातील भारतीय जनता पार्टीच्यावतीने राज्य सरकारच्या अडमोड धोरणाची निंदा करीत दारू वर कर कमी करण्याऐवजी राज्यात कार्यरत असलेल्या महविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील जनतेला दिलासा देण्यासाठी पेट्रोल व डिझेल वरील करामध्ये कपात करावी या करिता तहसीलदार राहुल गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.
राज्य सरकारने दारूवरील कर कमी केला महाराष्ट्रातील जनतेला दारू मध्ये सवलतीची गरज नाहीये तर सध्याच्या घडी मध्ये पेट्रोल व डिझेल मध्ये करांची कपात करण्याची गरज आहे हे महाविकास आघाडी सरकार नसून महामद्यपी सरकार आहे अशी टीका  करीत व्यापारी आघाडीचे शैलेश पोंदे यांनी सरकारच्या अडमोड धोरणाची निंदा केली. केंद्र सरकार पेट्रोल व डिझेलच्या करांमध्ये कपात केल्यामुळे जनतेला दिलासा मिळाला आहे.पेट्रोल- डिझेल वर केंद्र शासनाचना कर 19 तर राज्य शासनाचा 29 रुपये इतका कर असून राज्य सरकारने कुठलाही दिलासा न दिल्याने केंद्रपेक्षा राज्य शासनाचा कर जास्त लादला गेलेला आहे ज्याचा भार हा सामान्यांच्या खिशावर पडत आहे.यामुळे नागरिकांमध्ये असोंतोष वाढत आहे असा आरोप यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधतांना भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला.याप्रसंगी प्रदीप चव्हाण, संनमित पाजी, दीपक पवार, करण बागुल, गिरीश चापानेरकर, योगेश फुल्लारे, निलेश पारख, विनय संचेती आदी उपस्थित होते.