वैजापूर येथे डॉ.अनिल जोशी यांच्या स्मरणार्थ आयोजित मोफत आरोग्य व रक्तदान शिबीराला प्रतिसाद

 410 रुग्णांची तपासणी

वैजापूर ,२७मे /प्रतिनिधी :-सामाजिक बांधिलकी जपत वैद्यकीय सेवा देणारे स्व. डॉ.अनिल व्ही.जोशी यांच्या स्मरणार्थ कै. डॉ.विष्णुपंत जोशी चॅरिटेबल ट्रस्ट व जेआयआययूएस इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च नूर हॉस्पिटल बदनापूर आयोजित मोफत भव्य सर्व रोग निदान – उपचार व रक्तदान शिबिराला शुक्रवारी येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात 410 जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली तर 32 जणांनी रक्तदान केले. 

शहरातील मौलाना आझाद विद्यालयात आयोजित या मोफत रॉन निदान शिबिरात बदनापूर मेडीकल  कॉलेजच्या तज्ज्ञ डॉक्टर्स यांनी शहर व परिसरातिल विविध आजाराने ग्रस्त असणाऱ्या रुग्णांची मोफत तपासणी व उपचार केले. या महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अझहर सिद्दीकी, मुख्य  कार्यकारी अधिकारी डॉ. इलियास बेमात, वैद्यकीय अधिक्षिका  डॉ. इशरत फातिमा ,डॉ.रिझवान देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली 30 तज्ज्ञ डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही तपासणी केली. हृदय आजार, स्त्रियांचे आजार, त्वचा रोग, लघवीचे सर्व आजार, मेंदूचे आजार,नेत्र आजार,बाल आजार असे सर्व प्रकारच्या आजारांची तपासणी केली तर वैजापूर येथील मेडिस्टार यांनी मोफत रक्त तपासणी केली. 


या शिबिराचे उदघाटन डॉ.व्ही.जी. शिंदे, डॉ.एस.एम.जोशी, डॉ.राजीव डोंगरे यांच्या हस्ते  झाले.अध्यक्षस्थानी मेजर सुभाषचंद्र संचेती होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आ,रमेश पाटील बोरणारे,नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी, उपनगराध्यक्ष साबेरखान, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, बाळासाहेब संचेती,राजुसिंह राजपूत,  प्रमोद जगताप, मर्चंट बँकेचे चेअरमन विशाल संचेती, व्हाईस चेअरमन उल्हास ठोंबरे,सामाजिक कार्यकर्ते ठाकूर धोंडिरामसिंह राजपूत, नगरसेवक प्रकाश चव्हाण, इमरान कुरेशी, भगवान तांबे, सुरेश तांबे, डॉ,सुभाष शेळके, डॉ,नितेश शहा, शमीम सौदागर, प्रशांत कंगले, विजय वेद, डॉ,सुधाकर मापारी, डॉ,दिनेश राजपूत, डॉ. सचिन राजपूत,विनोद गायकवाड, नाजीम साहब, राजेंद्र लालसरे, हरीश पालेजा, सुधीर लालसरे, शैलेश पोदे आदींची उपस्थिती होती. सचिन जोशी, डॉ.अश्विन जोशी व समीर जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.