महाराष्‍ट्र, बिहार, उत्तर प्रदेश विधानपरिषदेसाठी व्दैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

नवी दिल्ली ,२५ मे /प्रतिनिधी :- महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहार विधान परिषदेमधून 06.07.2022 ते 21.07.2022 या कालावधीत निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या जागा भरण्यासाठी विधानपरिषदांच्या व्दैवार्षिक निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आणि बिहार विधानपरिषदांच्या ३० सदस्यांचा कार्यकाळ संपुष्‍टात येत आहे. त्या जागा भरण्‍यात येणार आहेत.राष्ट्रवादीकडून रामराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. रामराजे निंबाळकर हे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आहे. सध्या ते विद्यमान सभापती आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा संधी मिळेल. तर शिवसेनेकडून सुभाष देसाई यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारकडे सदस्य संख्या पाहता नवीन रणनीती आखली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेच्याही निवडणुका होणार आहे. एकूण १० जागांसाठी निवडणूक होणार आहे.  विधान परीषदेच्या आमदारांचा कार्यकाळ संपला आहे. यामध्ये रामराजे निंबाळकर, सुभाष देसाई, प्रविण दरेकर, प्रसाद लाड आणि सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे. त्यामुळे या जागी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून कुणा कुणाला उमेदवारी मिळणार हे पाहण्याचे ठरणार आहे.भाजपकडून प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत, प्रसाद लाड,  विनायक मेटे यांना उमेदवारी दिली होती. सदाभाऊ खोत आणि प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर या ना त्या मुद्यावरून जोरदार हल्लाबोल करत आहे. सदाभाऊ खोत यांनी अनेक आंदोलनातून कायम चर्चेत राहिले आहे. त्यामुळे सदाभाऊ खोत यांना पुन्हा संधी मिळणार हे पाहण्याचे ठरणार आहे.

महाराष्ट्रातील सदस्य पुढीलप्रमाणे

क्र .सदस्यनिवृत्ती दिनांक
 सदाशिव रामचंद्र खोत    07.07.2022 
 सुजितसिंह मानसिंह ठाकूर
 प्रवीण यशवंत दरेकर
 सुभाष राजाराम देसाई
 रामराजे प्रतापसिंह नाईक-निंबाळकर
 संजय पंडितराव दौंड
 विनायक तुकाराम मेटे
 प्रसाद मिनेश लाड
 दिवाकर नारायण रावते
 रामनिवास सत्यनारायण सिंह ( 02.01.2022 पासून रिक्त )

या निवडणुकीसाठी अधिसूचना दि. 2 जून, 2022 रोजी जारी करण्‍यात येणार आहे. तसेच निवडणूक अर्ज भरण्‍याची अंतिम तारीख 9 जून, 2022 पर्यंत आहे. अर्जांची छाननी 10 जून, 2022 रोजी होणार असून, 13 जून, 2022 पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. मतदान 20 जून रोजी सकाळी 9.00 ते सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत होणाार असून त्याचदिवशी सायंकाळी 5.00 वाजता मतमोजणी होणार आहे.

S. No.EventsDates
 Issue of Notification02nd June, 2022 (Thursday)
 Last Date of making nominations09th June, 2022 (Thursday)
 Scrutiny of nominations10th June, 2022 (Friday)
 Last date for withdrawal of candidatures13th June, 2022 (Monday)
 Date of Poll20th June, 2022 (Monday)
 Hours of Poll09:00 am- 04:00 pm
 Counting of Votes20th June, 2022 (Monday) at 05:00 pm
 Date before which election shall be completed22nd June, 2022 (Wednesday)

आयोगाने कोविड 19बाबत जारी केलेल्या विस्तृत मार्गदर्शक सूचना 02.05.2022 पत्रकाच्या परिच्छेद 06मध्ये दिल्या असून त्या पुढील लिंक वर उपलब्ध आहेत. जिथे लागू असेल तिथे संपूर्ण प्रक्रियेत सर्व व्यक्तींनी त्याचे पालन करावे.

संबंधित राज्यांच्या मुख्‍य सचिवांनी या निवडणुकीचा कार्यक्रम पार पाडण्‍यासाठी आवश्‍यक त्या उपाय योजना करण्‍याविषयी निर्देश आयोगाने दिले आहेत.

निवडणुका आयोजित करताना कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सध्याच्या सूचनांचे पालन केले जात आहे याची खात्री करण्यासाठी संबंधित मुख्य सचिवांना राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

विधान परिषदेची निवडणुकीसाठी विधान परिषदेचे सदस्य मतदान करत असतात. एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी 27 मतांची गरज असते. भाजपकडे मित्रपक्ष मिळून 113 जागा आहे. त्यामुळे चार उमेदवार सहज निवडून येऊ शकतात.तर महाविकास आघाडी पक्षाकडून कोणत्या नेत्याला संधी मिळणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.