युवतीशी बळजबरी लगट:आरोपीला दोन वर्षांचा कारावास

औरंगाबाद ,२५ मे /प्रतिनिधी :- घरात घुसून बेडरुमध्‍ये बसलेल्या युवतीशी बळजबरी लगट करण्‍याच प्रयत्‍न केल्याप्रकरणी आरोपी वैभव सुरेश दाणी (२७, रा. मुकुंदवाडी) याला दोन वर्षांचा कारावास आणि विविध कलमांखाली दहा हजार रुपयांच्‍या दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस.एस. मांजरेकर यांनी बुधवारी ठोठावली.

या प्रकरणात पीडित युवतीने फिर्याद दिली.पीडिता व आरोपी हे एकाच परिसरात राहतात. १९ फेब्रुवारी २०१८ रोजी सायंकाळी सहा वाजेच्‍या सुमारास पीडिता ही आपल्या बेडरुमध्‍ये बसलेली होती. त्‍यावेळी अचानक आरोपी वैभव दाणी बेडरुमध्‍ये शिरला, त्‍याने माझ्या मित्राचा लग्नाचा व्हिडीओ बघ असे म्हणत पीडितेच्‍या जवळ जाण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍यावर पीडितेने खाली चल आजी मला ओरडेल असे सांगितले. मात्र आरोपीने पीडितेला मिठीत घेण्‍याचा प्रयत्‍न केला असता पीडितेने त्‍याला दुर ढकलले. त्‍यानंतरही आरोपीने पीडितेचा टॉप ओढुन तिला  मिठीत घेण्‍याचा प्रयत्‍न केला, त्‍यामुळे घाबरलेल्या पीडितेने आजीला हाक मारुन आरडा-ओरड केला. तेव्‍हा आरोपीने पीडितेची माफी मागत घडलेला प्रकार आजीला सांगु नको असे म्हणुन तेथून धूम ठोकली. पीडितेने घडलेला प्रकार आजीला सांगितला. आजीने आरोपीला घरी बोलावले असता आरोपीने माझी चुक झाली, चपलांनी हाणा व माफ करा अशी विनंती केली. या प्रकरणात मुकुंदवाडी पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

या प्रकरणात तत्‍कालीन सहायक पोलिस निरीक्षक एस.ए. गिते यांनी तपास करुन न्‍यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्‍या सुनावणी वेळी सहायक सरकारी वकील भागवत काकडे यांनी चार साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्‍यात पीडिता आणि तिच्‍या आजीचा जबाब महत्‍वाचा ठरला. दोन्‍ही बाजुंच्‍या दोन्ही बाजुंच्या युक्तीवादानंतर साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपी वैभव दाणी याला दोषी ठरवून भादंवी कलम ४५२ अन्‍वये दोन वर्षे कारावास आणि पाच हजार रुपये दंड तर कलम ३५४ (अ) अन्‍वये एक वर्षे चार महिने सक्तमजुरी आाणि पाच हजार रुपयांच्‍या दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणुन अंमलदार अनिल खलाने यांनी काम पाहिले.