औरंगाबाद जिल्ह्यात ३२४ बाधित,सहा करोनाबाधितांचा मृत्यू

औरंगाबाद:जिल्ह्यात शुक्रवारी ३२४ नवे करोनाबाधित आढळून आले. यामध्ये शहर परिसरातील २३२, तर ग्रामीण भागातील ९२ बाधितांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १२,६७१ झाली आहे. पैकी ७७५३ करोनाबाधित हे आतापर्यंत करोनामुक्त झाले आहेत व सध्या ४४८६ बाधितांवर उपचार सुरु आहेत. तसेच शुक्रवारी जिल्ह्यात करोनामुक्त झालेल्या ५७५ व्यक्तींना (शहरातील ३५४, ग्रामीण भागातील २२१) सुटी देण्यात आली.

मात्र आतापर्यंत जिल्ह्यातील ४३२ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

महापालिका हद्दीत २३२ बाधित

शहर परिसरातील बाधितांमध्ये घाटी परिसरातील २, मुकुंदवाडी १, खोकडपुरा १, जालान नगर १, एन-११, हडको १, पडेगाव २, राम नगर १, नारेगाव १, हनुमान नगर १, एन-दोन, राम नगर ३, ब्रिजवाडी २, एन-सहा सिडको १, एन-एक, सिडको १, गुलमंडी १, सातारा परिसर १, एन-दोन, सिडको १, विठ्ठल नगर, एन-दोन १, बालाजी नगर, सिंधी कॉलनी २, गजानन नगर, गारखेडा १, अंबिका नगर, मुकुंदवाडी २, पुंडलिक नगर १, निशांत पार्क परिसर, बीड बायपास १, सिल्कमिल कॉलनी १, पद्मपुरा ११, छावणी ८, पद्मपाणी सोसायटी २, खडेकश्वर १, शिवशंकर कॉलनी १, कृष्णा नगर १, सम्राट नगर १, सूतगिरणी चौक परिसर १, एसटी कॉलनी १, खिंवसरा पार्क १, मर्चंट बँक परिसर, मोंढा १, मिसारवाडी १, एअर इंडिया कार्यालयामागे १, आरेफ कॉलनी १, तापडिया प्राईड परिसर, पैठण रोड १, छावणी १, लक्ष्मी कॉलनी २, भोईवाडा ४, नंदनवन कॉलनी १ आदी ठिकाणच्या व्यक्तींचा समावेश आहे. 

ग्रामीण भागात ९२ बाधित

ग्रामीण भागातील बाधितांमध्ये पिशोर, कन्नड येथील १, तिसगाव २, पवार गल्ली, कन्नड २, रामपूरवाडी, कन्नड १, नांद्राबाद, खुलताबाद १, पळसवाडी, खुलताबाद १, पाचोड १, निवारा नगरी, वैजापूर १, इंगळे वस्ती, वैजापूर ४, दुर्गावाडी, वैजापूर १, नांद्राबाद, खुलताबाद १, नारेगाव, राजेंद्र नगर १, चापानेर, कन्नड १, पैठण १, वाळूज १, सिल्लोड १, इंद्रकमल सोसायटी, वाळूज १, शिवाजी चौक, गंगापूर ३, जिकठाण १, सोयगाव १, रांजणगाव १, औरंगाबाद १०, सिल्लोड १, खुलताबाद ३, फुलंब्री १, पैठण ८, गंगापूर ३०, वैजापूर ११ आदी ठिकाणच्या व्यक्तींचा समावेश आहे.

सिटी एंट्री पॉइंटवर ४९ बाधित

सिटी एंट्री पॉईंटवर आढळून आलेल्या बाधितांमध्ये बन्सीलाल नगर येथील २, सातारा परिसर १, गारखेडा १, नक्षत्रवाडी १, सारा वैभव १, सिद्धार्थ नगर १, वाळूज ४, बजाज नगर ३, वडगाव १, पद्मपुरा २, चित्तेगाव १, आडूळ १, पंचशील नगर २, पंढरपूर १, जुना मोंढा १, मोंढा नाका १, एकलहरा १, सिल्कमिल कॉलनी २, कांचनवाडी २, पडेगाव ३, भावसिंगपुरा २, जातेगाव १, गोपाळपूर ६, राजीव गांधी नगर ३, राम नगर २, शेंद्रा १, वैजापूर १ आदी ठिकाणच्या व्यक्तींचा समावेश आहे.

करोना बळींची संख्या ४३२

शहर परिसरातील सहा करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील करोना बळींची संख्या ४३२ झाली आहे. त्याचवेळी जिल्ह्यात ३२४ नवे बाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या १२,६७१ झाली आहे व आतापर्यंत ७७५३ बाधित हे करोनामुक्त झाले आहेत व सध्या ४४८६ बाधितांवर उपचार सुरू आहेत.

शहरातील संघर्ष नगर येथील ५५, हर्सूल परिसरातील ६०, घाटी शासकीय निवासस्थानातील ५७, हडकोतील ७६, क्रांती नगरातील ६७, तर हर्सूल टी पॉइंट परिसरातील ७४ वर्षीय पुरूष करोनाबाधित रुग्णांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या मृत्युची संख्या ४३२ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *