अयोध्या दौऱ्याला विरोध हा एक सापळा-राज ठाकरे यांचा खळबळजनक आरोप

पुणे ,२२ मे /प्रतिनिधी :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी पुण्यातील सभेत बोलताना अयोध्या दौरा स्थगित करण्याचे कारण स्पष्ट केले. ‘पायाचे दुखणे सुरू झाल्यामुळे कमरेला त्रास होतो. त्याबाबतची शस्त्रक्रिया १ तारखेला आहे’, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली. तसेच ‘आपल्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणे म्हणजे एक सापळा होता आणि त्याला महाराष्ट्रातून रसद पुरविण्यात आली’, असा आरोपही त्यांनी केला.

Image

‘मी मुद्दाम दोन दिवस आधी या दौऱ्याबद्दल सांगितले. कोण काय बोलतेय? हे बघायचे होते. हा विषय मुद्दाम सुरू केला आहे. हा एक सापळा आहे, हे माझ्या लक्षात आले. प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासोबतच कारसेवकांना मारल्यानंतर शरयू नदीत मृतदेह टाकण्यात आले होते. त्याचे दर्शन मला घ्यायचे होते. जर मी अयोध्येत गेलो असतो आणि तिथे काही झाले असते, तर माझ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले असते. माझे कार्यकर्ते मी हकनाक घालवणार नाही. तिकडे केसेस टाकल्या गेल्या असत्या. एक कोणी तरी खासदार उठतो आणि मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो हे शक्य आहे का? माझ्यावर टीका होणार असेल तरी चालेल. पण कार्यकर्ते अडकू देणार नाही, असे ते म्हणाले.

Image

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

Image

संभाजी नगरच्या नामांतरावरून राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. केंद्रात सत्तेत असताना का नामांतर केले नाही, असा प्र्श्न त्यांनी विचारला. ‘मी म्हणतो’ म्हणजे काय याला काय अर्थ आहे, अरे तू आहेस कोण? वल्लभभाई पटेल आहेस की महात्मा गांधी? असा टोलाही त्यांनी लगावला.

Image

मातोश्रीसमोर हनुमान चालीसा म्हणायला ती काय मशीद आहे का?

Image

या सभेत ठाकरे यांनी राणा दाम्पत्याचा समाचार घेत निशाणा साधला आहे. मशिदीवरील अनधिकृत भोंगे हटवा ही मागणी आम्ही केल्यानंतर ते राणा दाम्पत्य उठले आणि मातोश्रीसमोर हनुमान चालीसा म्हणायचा हट्ट केला.

अरे मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणायला ती काय मशीद आहे का?”, असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राणा दाम्पत्याला जोरदार चपराक लगावली. पुण्यात गणेश कला क्रीडा येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी भोंग्यांच्या बाबतीतील पुढील आंदोलन, राणा दाम्पत्य, तसेच अयोध्या दौऱ्याला स्थिगिती या सर्वच विषयांवर राज ठाकरे यांनी भाष्य केले.

Image

भोंग्यांच्या बाबतीत मी सांगितले काय की जर मशीदीवरती जोरात बांग दिली तर त्यासमोर जाऊन हनुमान चालिसा लावा. आणि ते राणा दाम्पत्यांने काय केले. मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठणाचा हट्ट.. अरे मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणायला ती काय मशीद आहे का?”, अशा शब्दात राज ठाकरेंनी राणा दाम्पत्याचा समाचार घेतला. हे कोणी केले आणि यानंतर लडाखला संजय राऊत आणि राणा भेटले यावरूनच पहा हे कोणी केलं असं देखील यावेळी ठाकरे म्हणाले.

Image
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुण्यातील गणेश कला क्रीडा केंद्र येथील भाषण ऐकण्यासाठी आज प्रचंड गर्दी झाली. सभागृह खच्चून भरले होते. भाषण ऐकण्यासाठी आलेल्या अंध मुलांना राज ठाकरे यांनी आवर्जून व्यासपीठावर बोलावले.

पावसात भिजून भाषण करावे म्हटले पण निवडणुका नाही 

राज ठाकरे यांनी सभेला सुरुवात करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

राज ठाकरे सभेच्या सुरुवातीला म्हणाले, “आपल्या सभेला हॉल परवडत नाहीत, एसपी कॉलेजला विचारे होते, पण त्यांनी सभेसाठी नकार दिला. आता आम्हाला नाही तर कुणालाच नाही, असे ते म्हणाले. पावसात भिजून भाषण करावे म्हटले पण निवडणुका नाही, काही नाही, उगाच कशाला भिजत भाषण करा? अशा शब्दात राज ठाकरेंनी शरद पवारांना नाव न घेता टोमणा लगावला आहे.

शरद पवारांना औरंगजेब हा सुफी संत वाटतो

औरंगजेब हा सुफी संत वाटतो, असा खोचक टोला त्यांनी शरद पवार यांना लगावला. तसेच तुमच्या राजकारणासाठी तुम्ही इतिहास बदलणार आहात का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. शरद पवारांना औरंगजेब हा सुफी संत वाटतो. तर अफजलखान हा महाराजांना मारायला आलाच नव्हता, तर राज्याचा विस्तार करायला आला होता, असे पवार म्हणतात.

मग काय शिवाजी महाराज मध्ये आले होते का?, असे राज ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरे यांनी काल महाविकास आघाडी सरकार झालेले बघून बाळासाहेब ठाकरे यांना आनंद झाला असता, असे वक्तव्य केले होते. त्याचाही राज ठाकरे यांनी समाचार घेतला. असे वक्तव्य करून शिवसेना बाळासाहेबांची क्रेडिबिलीटी घालवत आहेत, शिवसेनेला एवढीही अक्कल नाही, असे ते म्हणाले.

पूर्वीही देशात जातीचे राजकारण होते. मात्र, जेव्हापासून राष्ट्रवादीचा जन्म झाला तेव्हापासून देशात जातीपातीचे राजकारण मोठ्या प्रमणात केले जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना हिंदू शब्दाची ॲलर्जी असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. तसेच शरद पवार हे नास्तिकच असल्याचे राज ठाकरे म्हणाले होते.

शरद पवार हे नेहमी सांगतात की, फुले-शाहू-आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र त्यांचा आहे. परंतु, आधी तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. फुले-शाहू-आंबेडकर हे शिवाजी महाराजांचा विचार घेऊन पुढे गेले आहेत. मी जात मानत नाही. माझा जातीपातीत विश्वास नाही, असेही राज ठाकरे म्हणाले होते.