उज्ज्वला अनुदानासंदर्भातला आजचा निर्णय कौटुंबिक खर्चाचा भार मोठ्या प्रमाणात हलका करेल : पंतप्रधान

पेट्रोल आणि डिझेलच्या भावातली लक्षणीय घट विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करेल, देशाच्या नागरिकांना दिलासा देईल : पंतप्रधान  
PM addressing the startup community during the Madhya Pradesh Startup Conclave in Indore, via video conferencing, in New Delhi on May 13, 2022.

नवी दिल्ली ,२१ मे /प्रतिनिधी :- उज्ज्वला अनुदानासंदर्भातला  आजचा निर्णय तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या भावातली घट विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करणार असून नागरिकांना दिलासा देऊन त्यांचे जीवन सुलभ करेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

अर्थमंत्र्यांनी या निर्णयाबाबत केलेल्या ट्वीटचा उल्लेख करून पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे:

“आमच्यासाठी नेहमीच जनता सर्वप्रथम असते!”

आजचे निर्णय, विशेषतः पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये लक्षणीय घट करण्यासंदर्भातला  निर्णय विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करेल, देशाच्या नागरिकांना दिलासा देईल आणि त्यांचे जगणे आणखी सुलभ करेल.   

“उज्ज्वला योजनेचा फायदा कोट्यवधी भारतीयांना, विशेषतः महिलांना झाला आहे. उज्ज्वला अनुदाना संदर्भातला आजचा निर्णय कौटुंबिक खर्चाचा भार  मोठ्या प्रमाणात  हलका  करेल.”

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानले आभार

केन्द्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्याबद्दल आणि गॅस सिलेंडरवर  200 रुपये अनुदान दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

आपल्या ट्वीट्स मध्ये अमित शाह म्हणाले की, “या आव्हानात्मक जागतिक परिस्थितीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करून आणि गॅस सिलेंडरवर  200 रुपये अनुदान देऊन सामान्य जनतेला मोठा दिलासा दिला आहे. अन्य क्षेत्रांसाठी देखील अशीच पावले उचलली आहेत, ज्यामुळे उत्पादनाच्या खर्चात कपात होईल.”

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांनी म्हटले आहे की, “मोदी जी देशातल्या प्रत्येक वर्गाची काळजी करणारे एक संवेदनशील नेता आहेत. त्यामुळे गेल्या 8 वर्षांपासून देशातल्या गरीब, शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या हिताची चिंता नेहमीच मोदी सरकारच्या निर्णयांच्या केंद्रस्थानी राहिली आहे. या जन-हिताच्या निर्णयाबद्दल मी नरेंद्र मोदी जी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे आभार मानतो.”