गोविंदभाईंच्या स्मृतीस्थळावर पुष्पांजली अर्पण

SARASWATI BHUVAN ALUMNI

औरंगाबाद:स.भु. शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष तथा थोर स्वातंत्र्यसेनानी पद्मविभूषण कै.गोविंदभाई श्रॉफ यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त (जयंती) आज 24 जुलै रोजी सकाळी 10 वाजता स.भु. महाविद्यालयाच्या मैदानावर, (कै.गोविंदभाई श्रॉफ स्मृतीस्थळ) औरंगपुरा, औरंगाबाद येथे शहरातील नागरिक तसेच गोविंदभाई-प्रेमींच्या वतीने पुष्पांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी स.भु. संस्थेच्या वतीने स.भु. संस्थाध्यक्ष राम भोगले यांनी कै.गोविंदभाईंच्या स्मृतीस्थळावर पुष्पांजली अर्पण केली.यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये स.भु. संस्थाध्यक्ष राम भोगले, कोषाध्यक्ष अरुण मेढेकर, सहचिटणीस मिलिंद रानडे, सुनील देशपांडे, स.भु. संस्था सदस्य डॉ.रश्मी बोरीकर, प्रमोद माने व राजन नाडकर्णी तसेच औरंगाबादेतील स्थानिक शाखांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. यामध्ये स.भु. विज्ञान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य बालाजी नागटिळक, स.भु प्रशालेच्या मुख्याध्यापिका निलीमा देशपांडे, शारदा मंदिर कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सविता मुळे, स.भु प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका परिमिता साने, स.भु शताब्दी प्रशालेचे अकॅडमिक डीन राहूल मोहनपूरकर तसेच प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *