स्वातंत्र्यसैनिक पत्नी निवृत्तीवेतनासाठी खंडपीठात,एसबीआय बॅंकेस नोटीस

औरंगाबाद: भारतीय स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतलेले  गोलटगाव (ता.औरंगाबाद) येथील अर्जून एकनाथराव साळुंके यांना पेन्शन मंजूर करण्यात आली होती. केंद्राची कुटुंब निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत मिळणारे निवृत्तीवेतन बंद झाल्यामुळे त्यांनी खंडपीठात धाव घेतली. न्या. सुनील देशमुख व न्या.श्रीकांत कुलकर्णी यांनी केंद्र राज्य सरकारसह स्टेट बॅक ऑफ इंडियाच्या शेंद्रा शाखेला नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहे.स्वातंत्र्यसैनिक साळुंके यांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील सहभागामुळे त्यांना केंद्राची कुटंब निवृत्तीवेतन व राज्याचे निवृत्तीवेतन मिळत होते. साळुंके यांचे २०१४ मध्ये निधन झाले. त्यानंतर त्यांच्या पत्नी द्रौपदाबाई यांना निवृत्तीवेतन मिळण्यास प्रारंभ झाला.त्यांना नोव्हेंबर २०१५ पर्यंत निवृत्तीवेतन मिळत होते. तेव्हा त्यांचे वय ८० वर्षे होते. त्या आजारी पडल्या आणि त्यांचे केंद्राकडील कुटुंबनिवृत्तीवेतन अचानक बंद करण्यात आले. नोव्हेंबर २०१५ पर्यंत हयात प्रमाणपत्र बॅकेंसडे जमा केले नसल्याने त्यांचे निवृत्तीवेतन थांबविण्यात आले. साळुंके यांनी जिल्ह्याधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार करून हयात प्रमाणपत्र मिळविले. स्टेट बंक ऑफ इंडियाकडे विनंती करूनही त्यांचीकेंद्राची कुटुंब निवृत्तीवेतन सुरू करण्यात आले नाही. गृहविभागाकडे त्यांनी अर्ज फाटे केले तरीही फायदा झाला नाही. द्रौपदाबाई यांनी कुटुंब निवृत्तीवेतनासाठी संदीप रामनाथ आंधळे यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली.खंडपीठाने केंद्र राज्य सरकारसह शेंद्रा येथील एसबीआय बॅंकेस नोटीस बजावून ११ऑगस्टला सुनावणी ठेवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.