छायाचित्र प्रदर्शनातून स्व. बाळासाहेबांच्या विविध छटांचे दर्शन – उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई,१९ मे /प्रतिनिधी :- मुंबई विद्यापीठाच्या बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्र तसेच सार्थ प्रतिष्ठान व बॉम्बे फोटोग्राफर असोसिएशनच्यावतीने विद्यापीठ परिसरात स्व.बाळासाहेब ठाकरे चित्र आणि चरित्र या विषयावरील दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनाला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी भेट दिली. श्री. देसाई म्हणाले की, विद्यापीठाने हे प्रदर्शन भरवून स्व.बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. बाळासाहेबांचे व्यक्तिमत्व प्रभावी होते. भाषण करण्याची त्यांची शैली वेगळी होती. त्यांची प्रत्येक हालचाल टिपण्यासारखी होती. आजच्या प्रदर्शनातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे दर्शन घडते.

यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते, आमदार मनीषा कायंदे, आमदार यामिनी जाधव, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, विद्यापीठाचे प्रकुलगुरू श्री.कुलकर्णी, प्रदीप सावंत आदी उपस्थित होते.यावेळी उत्कृष्ट छायाचित्रकारांना पुरस्कार व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.