वैजापूर तालुक्यातील जांबरगाव येथे 4 कोटी 60 लक्ष रुपये खर्चाच्या विकास कामांचा आ.बोरणारे यांच्या हस्ते शुभारंभ

वैजापूर ,१९ मे /प्रतिनिधी ;- मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत जलसंधारण विभागाकडुन वैजापूर-गंगापूर विधानसभा मतदारसंघातील गावांसाठी को.प. बंधारा, पाझर तलाव व सिमेंट बंधारा दुरूस्तीसाठी आमदार रमेश पाटील बोरणारे यांच्या विशेष प्रयत्नाने  39 कोटी 15 लक्ष रुपये मंजूर झाला आहे असून या निधीपैकी वैजापूर तालुक्यातील जांबरखेडा येथील 4 कोटी 60 लक्ष रुपये कामांचा शुभारंभ गुरुवारी (ता.19) आमदार रमेश पाटील बोरणारे यांच्या हस्ते झाला.

याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुरज शिंदे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भागीनाथराव मगर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रामहरी बापू जाधव, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील सदाफळ, माजी जिल्हा परिषद सदस्य मनाजी पाटील मिसाळ, जिल्हा जलसंधारण उपविभागीय अधिकारी ऋषिकेश देशमुख, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा लताताई पगारे, उपतालुकाप्रमुख पंढरीनाथ पाटील कदम, महेश पाटील बुनगे, युवासेना उपजिल्हाप्रमुख भरत पाटील कदम, विभागप्रमुख प्रभाकर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.