वैजापूर- गंगापूर वॉटर ग्रीड योजनेसाठी 1075 कोटींचा निधी मंजूर; आ.बोरणारे यांच्या प्रयत्नाला यश

वैजापुर – गंगापुर मतदार संघाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महाविकास आघाडी सरकारकडून आता कायमचा मार्गी लागणार

वैजापूर ,१८ मे /प्रतिनिधी ;-वैजापूर- गंगापूर तालुक्यातील 373 गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे.वॉटर ग्रीड योजनेअंतर्गत वैजापूर-गंगापूर तालुक्यासाठी 1075 कोटींचा निधी मंजूर करून प्रशासकीय मान्यता दिली.”मराठवाडा वॉटर ग्रीड” ही योजना संपुर्ण मराठवाड्यात राबवण्यात येत असून संबंधीत विभागाने वैजापुर-गंगापुर तालुक्याचा आराखडा तयार करून प्रस्ताव मंजुरीसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पाणीपुरवठा मंत्री  गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठवण्यात आला होता.


मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी सरकारने वॉटर ग्रीड ही महत्त्वकांक्षी योजना आखली आहे. “मराठवाडा वाॅटरग्रीड” ही योजना तीव्र पाणी टंचाई दूर करून ग्रामीण भागात शुद्ध पिण्याचे पाणी पोचवण्याच्या उद्देशाने असुन गावातील व वाड्या वस्त्यांवरिल जलकुंभास जोडण्यात येणार आहे, एका नागरिकास 55 लीटर प्रमाणे पाणी मिळेल या उद्दिष्टाने ही योजना राबविण्यात येणार आहे.
वैजापुर गंगापूर मतदार संघातील पिण्याच्या पाण्याचा हा अत्यंत महत्वाचा प्रश्न होता यासाठी मागील अनेक दिवसांपासून आमदार रमेश पाटील बोरणारे यांचा जलजीवन मिशन योजनेअंतर्गत वैजापुर – गंगापुर तालुका मराठवाडा वॉटर ग्रीड योजना मंजुरीसाठी पाठपुरावा सुरु होता. आज अखेर याच प्रयत्नांना यश आले व महाविकास आघाडी सरकारच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी वैजापूर – गंगापूर तालुका “मराठवाडा वॉटर ग्रीड” योजनेसाठी 1075 कोटी रुपये इतका भरघोस निधी मंजुर करून प्रशासकीय मान्यता दिली व आमदार रमेश पाटील बोरणारे यांच्या प्रयत्नाला यश आले.याप्रसंगी कृषी मंत्री दादाजी भुसे, परिवहन मंत्री  अनिल परब, खासदार अनिल देसाई, खासदार विनायक राऊत, पाणीपुरवठा विभागाचे सचिव संजीव जैस्वाल आदी उपस्थित होते.

वॉटर ग्रीड योजनेअंतर्गत वैजापूर-गंगापूर तालुक्यासाठी 1075 कोटींचा निधी मंजूर केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे आ.रमेश पाटील बोरणारे, माजी नगराध्यक्ष साबेर खान, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप यांनी आभार मानले आहे.