औरंगाबादेत ३२२ नवे कोरोनाबाधित,१२ मृत्यू

औरंगाबाद:जिल्ह्यात गुरुवारी ३२२ नवे करोनाबाधित आढळून आले. यामध्ये शहरातील २४४, तर ग्रामीण भागातील ७८ बाधितांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या १२,३४७ झाली आहे. त्याचवेळी गुरुवारी जिल्ह्यात ४८८ करोनाबाधित हे करोनामुक्त झाले. यामध्ये शहरातील ४५६, तर ग्रामीण भागातील २२ व्यक्तींचा समावेश आहे. तसेच आतापर्यंत ७,१७८ बाधित हे करोनामुक्त झाले व सध्या ४७४३ बाधितांवर उपचार सुरू आहेत. शहरातील ३२ ते ८० वयोगटातील १२ करोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोना बळींची संख्या ४२६ झाली आहे.

शहर परिसरात २४४ बाधित

शहर परिसरातील नव्या बाधितांमध्ये विठ्ठल नगर येथील २, गांधी नगर १०, दलालवाडी २, राम नगर ६, सावित्री नगर, हर्सूल ६, कुंभार गल्ली, हर्सूल १, पडेगाव ४, स्वामी विवेकानंद नगर ३, कैसर कॉलनी २, टाइम्स कॉलनी १, अविष्कार कॉलनी, एन-सहा १, पुंडलिक नगर १, छावणी १, पद्मपुरा १, क्रांती नगर १, बन्सीलाल नगर ४, बनेवाडी ३, छावणी १, मयूर पार्क १, उस्मानपुरा १, शिवशंकर कॉलनी ५, गुलमोहर कॉलनी, एन-पाच २, विश्वभारती कॉलनी २, हनुमान नगर, गल्ली क्रमांक पाच १, विष्णू नगर १, ठाकरे नगर, एन-दोन सिडको २, एन-दोन, जिजामाता कॉलनी १, बालाजी नगर २, एसआरपीएफ परिसर १, हिमायत बाग परिसर २, जवाहर कॉलनी १, सिल्कमिल कॉलनी १, गणेश नगर १, एसबी मुलांचे वसतिगृह परिसर १, दर्गा रोड परिसर १, देवगिरी नगर, सिडको २, पोलिस कॉलनी, मिल कॉर्नर २, टीव्ही सेंटर १, कासलीवाल गार्डन, मुकुंदवाडी १, मामा चौक १, अशोक नगर, मयूर पार्क १, एन-१२ हडको ३, हर्सूल टी पॉइंट १, एसआरपीएफ परिसर १०, मोनार्क सोसायटी, एन-१२ येथे १, एन-चार सिडको १, पडेगाव १ आदी ठिकाणच्या व्यक्तींचा समावेश आहे.

ग्रामीण भागात ७८

ग्रामीण भागातील कन्नड येथील १, साराभूमी परिसर, बजाज नगर २, वडगाव, बजाज नगर २, इंद्रप्रस्थ कॉलनी १, राजवाडा, गंगापूर २, इंदिरा नगर, वैजापूर १, इंगळे वस्ती, वैजापूर १, घायगाव १, परदेशी गल्ली, वैजापूर १, कमलापूर १, अंभई १, प्रसाद नगर, सिल्लोड १, रांजणगाव २, गंगापूर १, पिशोर रोड, कन्नड २, फुलंब्री १, सिल्लोड १, प्रसाद नगर, सिल्लोड १, औरंगाबाद तालुका २, गंगापूर १५, कन्नड १, खुलताबाद १, वैजापूर २६, पैठण १० आदी व्यक्तींचा समावेश आहे.

सिटी एंट्री पॉइंटवर ३०

सिटी एंट्री पॉईंटवर आढळून आलेल्या बाधितांमध्ये छावणी परिसर १, करमाड २, झाल्टा ७, संघर्ष नगर २, बारी कॉलनी १, वैजापूर २, बनेवाडी २, बजाज नगर ५, जोगेश्वरी १, मिसारवाडी १, एन-११ येथे १, बीड बायपास १, भावसिंगपुरा १, इतर ठिकाणचे ३ आदी ठिकाणच्या व्यक्तींचा समावेश आहे.

रामनगर येथील ३२ वर्षीय पुरुष रुग्णाला १३ जुलै रोजी घाटीत दाखल केले होते व दुसऱया दिवशी प्राप्त झालेल्या स्वॅब रिपोर्टवरुन रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. उपचारादरम्यान रुग्णाचा बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता मृत्यू झाला. मुकुंदवाडी परिसरातील ५५ वर्षीय पुरुष रुग्णाला २ जुलै रोजी घाटीत दाखल केले होते व त्याचदिवशी प्राप्त झालेल्या चाचणी अहवालावरुन रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. उपचारादरम्यान रुग्णाचा गुरुवारी (२३ जुलै) सकाळी ६ वाजून पाच मिनिटांनी मृत्यू झाला. तसेच बीड बायपास रोडवरील ६४ वर्षीय पुरूष, वंजारवाडीतील ७० वर्षीय महिला व ८० वर्षीय पुरूष, सेव्हन हिल परिसरातील ५६ वर्षीय पुरुष, पैठण गेट येथील ५५ वर्षीय महिला, मित्र नगरातील ६२ वर्षीय महिला, मिसरवाडीतील ४० वर्षीय महिला, लोटाकारंजा येथील ४९ वर्षीय पुरूष, शिवाजीनगर, गारखेडा परिसरातील ५२ वर्षीय पुरुष, बालाजी नगरातील ५७ वर्षीय महिला या कोरोनाबाधितांचाही उपचारादरम्यान विविध खासगी रुग्णालयांमध्ये मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोना बळींची संख्या ४२६ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *