आरोग्य विभागाच्या सुविधांअभावी कोरोनाग्रस्तचा मृत्यू- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचा आरोप

आम्ही करणार नाही इतरांना करू देणार नाही सरकारची भूमिका- लोणीकर यांचे सरकारवर टीकास्त्र

जालना, दि. 23 :-मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात करून आणि थैमान घातले असून महाराष्ट्राचा आकडा 3 लाख 27 हजारापेक्षा अधिक झाला आहे ही बाब अत्यंत गंभीर असून अद्याप देखील आरोग्य विभागाचे याकडे लक्ष नाही परभणी येथे रामदास धुळे नावाच्या व्यक्तीची व्हेंटिलेटर नसल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडलेली असताना उस्मानाबाद मध्ये देखील व्हेंटिलेटर अभावी एकाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे असे असताना आरोग्य विभाग कोरोनाग्रस्तांना कोणतीही सुविधा का देऊ शकत नाही असा सवाल माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी उपस्थित केला आहे
परभणी येथे रामदास आधुडे नामक पूरग्रस्त व्यक्तीची व्हेंटिलेटर नसल्यामुळे मृत्यू झाला आहे माझ्या जीवाचे बरे वाईट होऊ शकते मला ऑक्सीजन द्या अशी मागणी करणारा रामदास आधुडे यांचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे असताना आरोग्य विभाग का सुविधा देऊ शकत नाही हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे एकीकडे व्हेंटिलेटर नाही म्हणून मृत्यू होत असताना मुंबईमध्ये मात्र केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पी एम केअर मधून वेंटीलेटर आले म्हणून आवश्यकता नाही असे सांगत परत पाठवले जाणार आहेत अशी माहिती समोर येते आहे हा सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ असून आरोग्य विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले

महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा नाहीत तालुक्याच्या ठिकाणी किंवा एखादे व्हेंटिलेटर अशा परिस्थितीत असणे आवश्यक आहे परंतु महाराष्ट्रात कुठेही तालुकास्तरावर व्हेंटिलेटर आज रोजी उपलब्ध नाही खुद्द आरोग्य मंत्र्याच्या जिल्ह्यात सुद्धा व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीत ही बाब देखील अत्यंत खेदजनक आहे असेही लोणीकर यावेळी म्हणाले

खाजगी रुग्णालयात कोरोनाग्रस्त व्यक्तीकडून अवाजवी शुल्क आकारण्याची अनेक प्रकरणे देखील समोर येत आहेत अशावेळी सर्वसामान्यांनी दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न निर्माण झाला आहे कोरुना च्या नावाखाली महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांनी मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये 342 कोटी रुपयांचा निधी जमा केला आहे किमान त्या निधीमधून तरी व्हेंटिलेटर खरेदी करून नागरिकांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न सरकारने करावा अशी विनंती लोणीकर यांनी सरकारला केली आहे अनेक उद्योगपती व्यापारी सर्वसामान्य नागरिकांनी मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये ही रक्कम जमा केली आहे या निधी बरोबरच महाराष्ट्र सरकारने कोरोना ग्रस्तांच्या साठी किती निधी खर्च केला एकूण किती निधी खर्च करण्याचे नियोजन राज्य सरकारने केले आहे हे देखील राज्य सरकारने स्पष्ट करणे आवश्यक असल्याचे मत लोणीकर यांनी यावेळी व्यक्त केले
कालपर्यंत महाराष्ट्रातील 3 लाख 27 हजार 71 रुग्ण संख्या झाले असून जालना जिल्ह्यामध्ये हा आकडा 1580 रुग्णांपर्यंत पोहोचला आहे एकट्या जालना जिल्ह्यात 54 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला असून संपूर्ण महाराष्ट्रभर विदारक चित्र निर्माण झाले आहे तरीदेखील सरकार मात्र 84 पैशाचा मास्क 9 रुपयाला आणि 17 रुपयाचा 200 रुपयाला खरेदी करण्यात मग्न आहे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील बहुतांश भागांचा दौरा करून विविध रुग्णालयांना भेटी देऊन कोरोना काळात आरोग्य विभागाची परिस्थिती सक्षम आहे किंवा नाही याबाबत पाहणी करण्याचा धडाका सुरू केला होता परंतु सरकारने मात्र या दौऱ्यांना चाप बसावा या हेतूने कोणत्याही अधिकाऱ्यानी विरोधी पक्षनेत्याच्या दौऱ्यात किंवा बैठकीला न जाण्याबाबतची आदेश काढले आहेत त्यामुळे मी करणार नाही आणि दुसऱ्याला करू देणार नाही अशी काहीशी भूमिका राज्य सरकार घेत आहे योग्य नसून हे शिवशाही सरकार आहे कि मोगलाई हेच कळत नसल्याचे लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केले

मुख्यमंत्री सहायता कक्ष पूर्णपणे बंद असून राज्य सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत 1 लाख 22 हजार कोरोना रुग्णांना रुग्णसेवा दिल्याची माहिती महाराष्ट्राला दिली होती ती संपूर्ण माहिती खोटी असून 22 हजार लोकांना सुद्धा त्यातून लाभ मिळालेला नाही असे लोणीकर यांनी स्पष्ट केले. माहितीच्या अधिकारात मुख्यमंत्री सहायता कक्षाचे माजी कक्षप्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी माहिती मागवली असता वरिल धक्कादायक व खोटी माहिती पुढे आली असल्याची माहिती लोणीकर यांनी यावेळी दिली आहे

कोरोना साठी 50 लाखाचा आमदार निधी खर्च करण्याची राज्य सरकारने पोकळ घोषणा केली असून प्रत्यक्षात मात्र विधानसभेचे 288 आणि विधानपरिषदेचे 78 आमदार आपापला निधी देण्यासाठी तयार असताना प्रत्यक्षात मात्र राज्य सरकारने पाच लाखाचा निधी वर्ग केला आहे 50 लाखाची घोषणा करायची आणि पाच लाख रुपये वर्ग करायचे हा शासनाचा दुटप्पीपणा असून सरकारने पोकळ घोषणा केली की संबंधित जिल्हाधिकाऱ्यांचा दोष आहे याबाबत देखील शासनाने खुलासा करावा व आमदारांच्या निधीतून ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी व्हेंटिलेटर ची व्यवस्था करावी अशी मागणी देखील लोणीकर यांनी केली*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *