वैजापूर शहरात तीन दिवसीय मोफत नेत्र तपासणी शिबीर

वैजापूर ,१७ मे /प्रतिनिधी ;-वैजापूर येथील प्रभाग क्रमांक सातचे नगरसेवक शैलेश चव्हाण यांच्या पुढाकाराने मंगळवार रोजी मंगल आय केअर फाउंडेशन मुंबई/नाशिकच्या वतीने तीन दिवशीय मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या शिबाराचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांच्या उपस्थितीत  झाले. शहरातील प्रभाग क्रमांक सात मधील अण्णाभाऊ साठे नगर, पोटे गल्ली व न्हावी गल्ली येथे बुधवारी (ता.18) तसेच मुंजाळी गल्ली,देशपांडे गल्ली व पाटील गल्ली येथे गुरुवार(ता.19)रोजी नेत्र तपासणी शिबीर होणार आहे. नागरिकांनी आपले नेत्र तपासून सहकार्य करावे असे आवाहन नगरसेवकशैलेश चव्हाण व सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यानी केले आहे.