धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे या बहुचर्चित सिनेमा हाऊसफुल्ल

औरंगाबाद ,१७ मे /प्रतिनिधी :-शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने दिवंगत शिवसेना नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित “धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे” या बहुचर्चित सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. यासाठी लोक मतदार संघातील सर्व शिवसैनिकांना तसेच नागरिकांना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यातर्फे या सिनेमाचा मोफत शो, मंगळवारी अंजली बिग सिनेमा टॉकीज, खडकेश्वर येथे मोफत दाखवण्यात आला.

हा शो शिवसैनिक व युवासैनिक आणि महिला आघाडीच्या पदाधिकारी यांनी मोठी गर्दी करत हाऊसफुल्ल झाला होता.सकाळपासून विविध ठिकाणी व भागातून शिवसैनिक घोषणा देत चित्रपटगृहात दाखल झाले. सुरुवातीला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, वैजयंती खैरे, आमदार संजय शिरसाठ, माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.याप्रसंगी युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे, ऍड. आशुतोष डंख, जिल्हायुवाअधिकारी हनुमान शिंदे, कॉलेज कक्षप्रमुख ऋषिकेश जैस्वाल, उपजिल्हाप्रमुख गणू पांडे, बंडू ओक, विधानसभा संघटक गोपाळ कुलकर्णी, उपशहर बाळू गडवे, चंद्रकांत इंगळे, माजी नगरसेवक सचिन खैरे, किशोर नागरे, विरु गादगे,  मकरंद कुलकर्णी, युवासेना सरचिटणीस किरण तुपे, बंटी जैस्वाल, महिला आघाडीच्या सुनीता आऊलवार, समनव्यक कला ओझा, सुनीता देव, मंजुषा नागरे, रेणुका जोशी, प्राजक्ता राजपूत, विभागप्रमुख विनायक देशमुख, संदीप हिरे, बंटी जैस्वाल, स्मिता जोशी, ज्योती जैन, वनिता ठाकूर, उपजिल्हा संघटक जयश्री लुंगारे, राज्यश्री राणा, मीरा देशपांडे, संगीता पोकुले, राज्यश्री पोफळे, जयश्री इंदापुरे, देवयानी सीमंत, सुनीता सोनवणे, गणेश मुळे, दिनेश तिवारी, देविदास रत्नपारखी, सागर खरगे, मनोज क्षीरसागर, योगेश मिटकर, बळीराम देशमाने, विकास लूटे, शिवम पांडे, संतोष जाटवे, किरण लखनाणी, कृष्णा भोसले, दत्ता कनिसे, सुरेशअप्पा व्यवहारे, सचिन गोखले आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.