व्यायामशाळा सुरु करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करा-औरंगाबाद  खंडपीठाचे निर्देश

औरंगाबाद : व्यायामशाळा सुरु करण्यासंदर्भात शासनाने निर्णय न घेतल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेवर न्या.संजय  गंगापूरवाला आणि न्या. आर.जी.अवचट यांच्या समोर सुनावणी झाली असता त्यांनी शासनाकडे त्यासाठी पाठपुरावा करा, त्यांना धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार आहे असे म्हणत याचिका निकाली काढली.

करोनाचे संक्रमण रोखण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन लावण्यात आले होते . त्यामुळे सर्व व्यवसाय बंद होते. लॉकडाऊनच्या अटी शिथील झाल्यानंतर शासनाने काही व्यवसाय सुरु करण्याची परवनागी दिली. त्यानंतर राज्यातील व्यायम शाळा बंद असल्यामुळे त्या सुरु करण्याची परवानगी देण्यात यावी अशी विनंती  शासनाकडे वेळोवेळी करण्यात आली होती. शासनाने त्यावर निर्णय न घेतल्यामुळे शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त संजय मोरे यांनी औरंगाबाद  खंडपीठात याचिका दाखल केली. व्यायाम शाळा बंद असल्यामुळे  खेळाडू, प्रशिक्षक, डायटीशियन, केअरटेकर यांचा रोजगार बंद झाला असल्याचे याचिकेत नमुद करण्यात आले. या याचिकेवर सुनावणी झाली असता खंडपीठाने  आदेश देत याचिका निकाली काढली. याचिकाकर्त्याची बाजू श्रीपाद कुलकर्णी यांनी तर सरकारपक्षाच्या वतीने सरकारी वकील  डी. आर. काळे यांनी मांडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *