घायगाव येथील संत जनार्दन स्वामी आश्रम व कुटीया परिसरात 20 लक्ष रुपयांच्या विकास कामाचे शांतिगिरी महाराज यांच्या हस्ते लोकार्पण

वैजापूर ,१५ मे /प्रतिनिधी ;-वैजापूर तालुक्यातील घायगाव येथील श्री.संत जनार्दन स्वामी आश्रम व कुटीया परिसर येथे विविध विकास कामांसाठी आमदार रमेश पाटील बोरणारे यांनी पर्यटन विभाग अंतर्गत मंजुर करून आणलेल्या 20 लक्ष रुपये निधीच्या विकास कामांचे लोकार्पण शनिवारी श्री.श्री.1008 महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आ. रमेश पाटील बोरणारे यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष साबेर खान, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, उपविभागप्रमुख हरिदास पाटील साळुंके,पंचायत समिती सदस्य रविंद्र कसबे, शांतीलाल पहाडे, सामाजिक कार्यकर्ते ठाकूर धोंडीरामसिंह राजपूत, सरपंच दौलतभाऊ गायकवाड, विकास पाटील गायकवाड, पोलीस पाटील आप्पासाहेब गायकवाड, उपसरपंच प्रविण धने, ईश्वर धने, दादासाहेब पाटील, साळुंके, सागर गायकवाड, विष्णू भाऊ वाघ, नवनाथ पाटील साळुंके, कृष्णा साळुंके, सुनिल पाटील, गणेश निकोले, सुनिल साळुंके, अमोल साळुंके, ऋषी वाघ व बाबाजी भक्त परिवार मोठ्यासंख्येने उपस्थित होते.