डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात व्यवस्थापन शास्त्र विभागात दोन दिवसीय कार्यशाळा

औरंगाबाद ,११ मे /प्रतिनिधी :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन शाखा विभागाच्या वतीने दोन दिवसीय कार्यशाळेेेचे आयोजन करण्यात आले आहे. १२ आणि १३ मेे रोजी व्यवस्थापन शास्त्र विभागात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा होईल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन शास्त्र विभागाने मराठवाडा विभागात व्यवस्थापन शिक्षण क्षेत्राची सुरूवात करणारा विभाग असा नावलौकिक विभागाने जपला आहे. बिझनेस आणि औद्योगिक क्षेत्रातील जगातील सर्वोत्तम व्यवस्थापक आणि उद्योजक विभागाने दिले. याव्यतिरिक्त प्लेसमेंट आणि औद्योगिक संधी, कार्यशाळा, तज्ज्ञांशी संवाद, औद्योगिक भेट, इ़ंर्टर्नशीप, व्यवस्थापनाशी संबंधित वेगवेगळे प्रकल्प या सारख्या महत्त्वाच्या उपक्रमातही विभागाने खास ओळख मिळवली.

विभागाच्या अभ्यासक्रमानुसार व्यवस्थापन शास्त्र विभागातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे. ‘करिअरच्या संधींसाठी डिजिटल साधनांचा लाभ घेणे’ (Leveraging Digital Tools for Career Growth Opportunities) कार्यशाळेचा विषय आहे. या क्षेत्रात २२ वर्षांचा अनुभव असणारे सुरेखा सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक योगेश उदगिरे कार्यशाळेला मार्गदर्शन करतील. करिअरच्या संधीबाबत जनजागृती आणि एमसीए आणि एमबीए विद्यार्थ्यांमध्ये रोजगार कौशल्याची निर्मिती करणे हा या कार्यशाळेचा उद्देश आहे. कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन व्यवस्थापन शास्त्र विभागाने केले आहे.