महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेडचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कौतुक

मुंबई ,१० मे /प्रतिनिधी :- नागरी उड्डयन मंत्रालय, भारत सरकार (एमओसीए) आणि फिक्की द्वारे आयोजित विंग्स इंडिया 2022 इव्हेंट आणि अवार्डस् समारंभात अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमएडीसीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांचे अभिनंदन केले असून एमएडीसी भविष्यातही उत्तम कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यावेळी उपस्थित होते.

शिर्डी आणि नागपूर विमानतळांसाठी “बेस्ट स्टेट विथ अ डेडिकेटेड आउटलुक फॉर द एव्हिएशन सेक्टर” या श्रेणीतील हा पुरस्कार हैदराबाद येथे आयोजित समरंभात अलीकडेच प्रदान करण्यात आला होता.