वैजापूर शहरात महाराणा प्रतापसिंह यांची जयंती उत्साहात साजरी

वैजापूर, १० मे  /प्रतिनिधी :- हिंदवी सूर्य महाराणा प्रतापसिंह यांची 482 वी जयंती सोमवारी शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शहरातील सर्व थरातील नागरिक व तरुणवर्ग  महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्याजवळ एकत्र जमा झाला आणि या सर्वांनी  महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

तिथी प्रमाणे महाराणा प्रताप सिंह यांची जयंती जेष्ठ शुद्ध 3 म्हणजे 2 जून रोजी असल्याने  जयंती उत्सव  पुढील महिन्यातील  2 जून रोजी भव्य स्वरूपात साजरा होईल असे यावेळी जाहीर करण्यात आले.   

या प्रसंगी नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, राजपूत समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत, धीरज राजपूत, प्रेम राजपूत, गणेश खैरे, दिनेश राजपूत, मनोज राजपूत, विजय राजपूत, स्वप्नील राजपूत, सागर राजपूत, शरद राजपूत, करण राजपूत, डॉ.योगेश राजपूत, अमोल राजपूत, जितू राजपूत, मनोज राजपूत, राजवीर परदेशी, सचिन राजपूत, आर.पी. क्षीरसागर, विश्वजीत राजपूत, गोकुळ राजपूत, ॲड. सुरज राजपूत, हर्षद राजपूत,सोनू राजपूत,अजय राजपूत, विजय खोकड, दीपक बरकसे आदी उपस्थित होते.