काम करणाऱ्याच विरोध होतो, मात्र तो थांबत नाही – शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

समर्थनगर वॉर्डात ८० लक्ष रुपयांच्या कामाचा शुभारंभ

औरंगाबाद ,१० मे /प्रतिनिधी :-राज्यात असो शहरात चांगले काम केले की कुणीही शाबासकी देत नाही. उलट कामात चुका काढून कामाची गती थांबवता. नेहमी काम करणाऱ्याच विरोध होतो, मात्र तो थांबत नाही, असे प्रतिपादन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून समर्थनगर वॉर्डात ८० लक्ष रुपयांच्या मंजूर कामाचा शुभारंभ झाला. यावेळी आमदार प्रदीप जैस्वाल, महापौर नंदकुमार घोडेले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले की, विरोधक धार्मिक वाद काढून महागाई वरून लक्ष बाजूला करत आहेत. जुन्या योजना इतक्या रुपयांची होती, ती दुपटीने वाढली. पाणी दररोज द्या म्हणत आहे, मात्र शहर मोठ्या प्रमाणात वाढल्याने सुरुवातीला अडचणी येतात, असे ते म्हणाले.

लवकरच शहरातील विकाम कामे मार्गी लागून नागरिकांना न्याय मिळणार आहे.युवासेना उपसचिव तथा नगरसेवक ऋषिकेश खैरे यांनी नागरिकांच्या सूचनेनुसार व माझ्या पाठपुराव्याला वरिष्ठांनी केलेल्या सहकार्याने आज वॉर्डातील रस्ते चकचकीत होणार आहे.यावेळी ऍड. आशुतोष डंख, कॉलेज कक्षप्रमुख ऋषिकेश जैस्वाल, जिल्हा समनव्यक संदीप लिंगायत, पोलीस मित्र सुधीर जाधव, सचिन जोशी, विभागप्रमुख विनोद बोरखडे, विनायक देशमुख, उपविभागप्रमुख शिवाजी पाथरीकर, महिला आघाडीच्या किरण शर्मा, सीए संचेती, प्राचार्य ऍड. राव, युवासेनेचे ऍड. निलेश बोरखडे, ऍड. मयुर यादव, अकर्ष माळवदकर, शाखा अधिकारी अक्षय कुंटे, सचिन राठोड, शिवम पांडे, राजेंद्र गरड, लक्ष्मण गिरे आदींसह शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.