वैजापूर येथे उद्यापासून “नौगाजी बाबा” ऊरूसास प्रारंभ ; दोन वर्षांनंतर उरूस भरणार

वैजापूर, १० मे  /प्रतिनिधी :-येथील हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रसिद्ध धार्मिक ठिकाण असलेल्या शहीद हजरत सय्यद शाह रुक्नोद्दीन उर्फ नौगाजी बाबा यांच्या उरुसास बुधवारपासून प्रारंभ होत आहे. कोरोना महामारीच्या दोन वर्षांनंतर हा उरूस भरवला जात आहे. उरूस निमित्ताने नौगाजी बाबांच्या दर्ग्यावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.

उरुसच्या जागी रहाट पाळणे, सर्कस व ख्याजाच्या दुकाना थाटल्या आहेत., या दर्गाचे खादीम(सेवेकरी) सय्यद कैसरअली,शेख सलीम, ख्याजा शेख, अकबर भाई, हिकमतउल्ला यांनी सेवेला आजपासूनच प्रारंभ केला आहे.  बुधवार रोजी संदल शरीफ चे आयोजन दुपार तीन ते रात्री दहा वाजेपर्यंत, सायंकाळी  कव्वालीचा शानदार मुकाबला कव्वाल सलीम जावेद (बंगळूरु) व सीमा सबा (नागपूर) गुरुवार (ता.12)रोजी सायंकाळी सहापासून दुसरा कव्वाली मुकाबला सलीम रजा (मुंबई)व शबनम निबाजी (दिल्ली) यांच्यात होणार आहे शुक्रवार (ता.13) रोजी कुस्त्यांचे जंगी सामने होणार आहेत. शोभेच्या दारूची आतषबाजी ही होणार आहे.

हिंदू -मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला नौगाजी बाबांचा उरूस प्रसिद्ध असून या उरुसासाठी राज्य भरातून भाविक येतात. नगरपालिकेच्यावतीने भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उरूस शांततेत व उत्साहात साजरा व्हावा यासाठी उरूस समिती प्रयत्नशील आहे. नागरीक व भक्त-भाविकांनी शांतता, बंधुभाव राखून नौगाजी बाबांचे आशीर्वाद घ्यावे असे आवाहन उरूस समितीने केले आहे.