19 राज्ये/केंद्र शासित प्रदेशांमध्ये 63.13 टक्क्याहून अधिक रुग्ण बरे होण्याच्या दराची नोंद

नवी दिल्ली, 22 जुलै 2020

एकाच दिवसात सर्वाधिक म्हणजे 28 हजार 472 रुग्ण बरे झाल्याची नोंद झाली आहे. शिवाय गेल्या 24 तासात बरे झालेल्या/ घरी सोडण्यात आलेल्या कोविड-19 रुग्णांची ही सर्वाधिक संख्या आहे. यासह, बरे झालेल्या रूग्णांची संख्या आता 7 लाख 53 हजार 49 इतकी आहे. यामुळे कोविड-19 रूग्णांमधील बरे होण्याचा दर 63.13 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

रुग्ण बरे होण्याच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे सक्रिय रुग्ण संख्येत (4 लाख 11 हजार 133 आजची संख्या) 3 लाख 41 हजार 916 पर्यंत फरक पडला आहे. हा फरक उतरोत्तर वाढत जाणाऱ्या प्रगतीचे निदर्शक आहे.

राष्ट्रीय पातळीवर रुग्ण बरे होण्याचा दर सुधारला असताना 19 राज्ये/ केंद्र शासित प्रदेशामधील हाच दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे.

राज्ये/केंद्र शासित प्रदेशरुग्ण बरे होण्याचा दर
दिल्ली84.83%
लडाख (केंद्र शासित प्रदेश)84.31%
तेलंगणा78.37%
हरियाणा76.29%
अंदमान-निकोबर बेटे75.00%
राजस्थान72.50%
गुजरात72.30%
छत्तीसगड71.81%
आसाम71.05%
ओदिशा70.96%
तामिळनाडू70.12%
मणीपुर69.48%
चंदीगढ68.97%
उत्तराखंड67.99%
पंजाब67.86%
मध्यप्रदेश67.47%
दादरा-नगर हवेली, दीव-दमण65.67%
हिमाचल प्रदेश64.72%
बिहार63.95%

बरे झालेल्या रुग्णांची सातत्याने वाढती संख्या, तसेच सक्रिय व बरे झालेल्या रूग्णांमधील वाढता फरक, या गोष्टीची साक्ष देतात, की केंद्राने अवलंबलेली व राज्य/ केंद्र शासित प्रदेश सरकारांनी राबवलेली धोरणे इच्छित परिणाम साधत आहेत. घरोघरी केलेले सर्वेक्षण, देखरेख ठेवणे, प्रभावी नियंत्रण योजना, असुरक्षित लोकांची तपासणी व विस्तारीत प्रसार-चाचणी यांच्या माध्यमातून बाधित रुग्ण लवकरात लवकर शोधण्यावर प्राथमिक लक्ष केंद्रित केले गेले आहे. तीन-स्तरीय आरोग्य पायाभूत सुविधा व उत्तम प्रकारे अंमलात आणलेल्या काळजी घेण्याच्या नियमावलीने रुग्णालय तसेच गृह-विलगीकरण यांच्याद्वारे प्रभावी उपचारांना मदत झाली आहे.

एम्स, नवी दिल्लीने, राज्ये/ केंद्र शासित प्रदेशांमधील उत्कृष्ट केंद्रांच्या सहाय्याने अति दक्षता विभागामधील रूग्णांचे उपचार करण्यास व काळजी घेण्यास मदत केली आहे; ज्यायोगे भारतात कोविड रुग्णांचे प्रमाण कमी राखणे शक्य झाले आहे. एम्स, नवी दिल्लीचा ‘ई-आयसीयू’ कार्यक्रम केंद्र-राज्य सहकार्याचा आणखी एक मार्ग आहे, ज्याचा उद्देश मृत्युदर कमी करण्याचा आहे. आठवड्यातून दोनदा आयोजित या ‘टेलि-कन्सल्टेशन’ सत्रांमुळे अति दक्षता विभागातील रूग्णांच्या व्यवस्थापनातील तज्ज्ञांच्यासमान अनुभव व तांत्रिक सल्ल्याद्वारे राज्यातील मोठ्या कोविड-19रुग्णालयांना मार्गदर्शन व आधार मिळत आहे. आरोग्य सेवा कर्मचार्‍यांच्या समर्पित प्रयत्नांमुळे रुग्ण बरे होण्याचा दर सुधारत आहे व मृत्यू प्रकरणांची संख्या सतत कमी होत आहे, जी सध्या 2.41% आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *