वैजापूर शहरात झन्ना-मन्ना खेळणारे 19 जुगारी पकडले ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

वैजापूर, ७ मे  /प्रतिनिधी :- औरंगाबाद येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी शहरातील परदेशी गल्ली भागात छापा टाकून पत्त्यावर पैसे लावुन झन्ना- मन्ना नावाचा जुगार खेळणाऱ्यांचा अड्डा उध्वस्त केला. या कारवाईत रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, मोबाईल असा एक लाख तीन हजार 420 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून अड्डा चालकासह 20 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 
जुगार अड्डा चालक संतोष राजपूत उर्फ धोनी हा पोलिसांना चकमा देऊन  पसार झाला. परदेशी गल्ली भागातील त्यांच्या घरात जुगाराचा अड्डा सुरु असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक विजय जाधव, हेड कॉन्स्टेबल राख, नागझरे, गांगवे, चव्हाण चौधरी यांच्यासह वैजापूर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस उपनिरीक्षक विजय खोकड, बिरुटे यांच्या पथकाने सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास परदेशी गल्ली येथे छापा टाकला. त्यावेळी पत्त्यावर पैसे लावुन जुगार खेळताना 20 जण आढळुन आले. अनिल राजपूत (जीवनगंगा वसाहत), लक्ष्मण जगताप (भग्गाव), शेख अन्सार शेख जब्बार (परदेशी गल्ली), नारायण राजपूत (परदेशी गल्ली), मच्छिंद्र त्रिभुवन (आंबेडकर नगर), शेख हाजी अब्दुल हाकीम  (परदेशी गल्ली), गुलाबसिंग राजपूत (रोटेगाव स्टेशन), शेख अहमद बेग (शिवराई रोड), जाकिर शहा मोहम्मद शहा (लाडगाव रोड), शांतीलाल राजपूत (कादरीनगर), शेख जमीर शेख गणी (दर्गाबेस), राजेंद्र हंगे (परदेशी गल्ली), शेख फारुख शेख इस्माईल (खान गल्ली), अशोक टिळेकर(पोलिस स्टेशनजवळ), शारुख बेग सादर बेग (दर्गा बेस), खलील अब्बास शेख (परदेशी गल्ली), इफ्तकार शहा गुलजार (नाईकवाडी गल्ली), शेख शकील शेख कलीम(जुने स्टेट बॅकेजवळ), उमेश गायकवाड (परदेशी गल्ली) अशी आरोपींची नावे असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.