पद्माकरराव मुळे यांचा वाढदिवस रक्तदान आणि वृक्षारोपण करून साजरा

औरंगाबाद ,७ मे /प्रतिनिधी :- छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे सचिव पद्माकरराव मुळे यांचा आज ७६ वा वाढदिवस. त्यांचा वाढदिवस रक्तदान शिबीर आणि वृक्षारोपण करून उत्साहात साजरा करण्यात आला. 

रक्तदान शिबिराचे उद्घाटन संस्थेचे प्रशासकिय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी डॉ देशमुख म्हणाले की ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ अशा पाट्या तुम्ही हॉस्पिटल किंवा अन्य ठिकाणी वाचल्या असतील. रक्तदानामुळे माणसाचा जीव वाचू शकतो. आता तर प्रगत तंत्रज्ञानामुळे रक्तातल्या वेगवेगळ्या घटकांचाही वेगवेगळ्या रुग्णांकरिता वापर करणं शक्य होतं. वैद्यकीय तंत्रज्ञान प्रगत झाले असले तरीही रक्ताला पर्याय नाही. रक्ताचा प्रश्न सतत भेडसावत असतो. रुग्णांना रक्ताची गरज असली की कुटुंबीय सैरभैर होतात. थॅलेसेमिया असलेली मुले रक्ताचा तुटवडा पडला की जीवन-मरणाच्या रेषेवर झुंजत राहतात . रक्तदानाबद्दलची जागरूकता मोठ्या प्रमाणावर निर्माण करण्यासाठी या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यानंतर अधिकारी, कर्मचारी आणि विद्याथिर्नीनी रक्तदान करुन आपले कर्तव्य बजावले. औरंगाबाद थेलेसेमिया सोसायटीचे श्री. सत्य साई रक्त केंद्र यांच्या माध्यमातून १५५ बॅगचे संकलन करण्यात आले. रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.       

सी. एस. एम. एस. एस. कॅम्पसमध्ये श्री. पद्माकरराव मुळे यांच्या वाढदिवसानिमित्त ७६ देशी झाडांचे वृक्षारोपण करून त्याचे पालकत्व आणि संगोपन करण्याची जवाबदारी सर्वानी घेतली. यावेळी डॉ. नंदिनी तिवारी, डॉ. महेंद्रसिंह चौहान,  प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. सुभाष भोयर, डॉ. लता काळे, डॉ. दत्तात्रय  शेळके, डॉ. गणेश डोंगरे, डॉ. उल्हास शिंदे, डॉ. जयश्री  देशमुख, श्री अशोक आहेर, श्री. संजय वाळुंज पाटील, कार्यालय अधिक्षक, विभागप्रमुख आणि कर्मचारी हजर होते.