राज्यसभेत नवनिर्वाचित सदस्य भाजपचे डॉ . कराड यांचा शपथविधी 

राज्यसभेतील भाजपचे खासदार डॉ भागवत कराड यांनी शपथ घेतल्यावर आपल्या पत्नी डॉ अंजली ,मुले हर्षवर्धन ,वरुण 
राज्यसभेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी; महाराष्ट्रातून ६ सदस्यांनी घेतली शपथ

नवी दिल्ली, दि. 22 :माजी महापौर डॉ. भागवत कराड यांनी दिराज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. राज्यसभा सभागृहात हा शपथविधी समारंभ झाला. राज्यसभेचे चेअरमन व्यंकय्या नायडू  यांनी त्यांना शपथ दिली.

            भाजपच्या कोट्यातून डॉ. भागवत कराड, केंद्रीय राज्यमंत्री मंत्री रामदास आठवले आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपल्या पदाची  शपथ  घेतली.राज्यसभेच्या ५७  जागांसाठी  मार्च महिन्यात निवडणूक प्रकिया पार पडली होती. महाराष्ट्रातून १८ मार्च रोजी सात जागाची  बिनविरोध निवड झाली होती.डॉ.भागवत कराड यांच्या रूपाने औरंगाबाद शहराला राज्यसभेची  खासदारकी मिळालीत.कराड हे अहमदपूर तालुक्यातील चिखली खेड्यातील  असून, शासकीय वैद्यकीय महविद्याल  औरंगाबाद येथे वैद्यकीय  शिक्षण पूर्ण केलेले आहे. औरंगाबाद शहराचे दोनदा महापौर, भाजपा राज्य कार्यकारणीचे उपाध्यक्ष  आणि  मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी त्यांनी दोन वर्षे कारभार पहिला.मराठवाड्यात भाजपा वाढविण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे.  

राज्यसभेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी; महाराष्ट्रातून ६ सदस्यांनी घेतली शपथ
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तसेच माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार

राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज पार पडला. महाराष्ट्रातून 6 सदस्यांनी राज्यसभा सदस्य पदाची शपथ घेतली. उपराष्ट्रपती तसेच राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली.

Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) | Twitter
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाचे राज्यमंत्री रामदास आठव

संसदेतील वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत आज नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी झाला. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तसेच माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाचे राज्यमंत्री रामदास आठवले, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राजीव सातव, भारतीय जनता पक्षाचे डॉ. भागवत कराड, उदयनराजे भोसले, शिवसेना पक्षाच्या प्रियंका चतुर्वेदी अशा एकूण 6 सदस्यांनी आज राज्यसभेच्या सदस्य पदाची शपथ घेतली. श्री. पवार आणि श्री. आठवले यांनी दुसऱ्यांदा राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.    

Congress is getting unprecedented response in Gujarat: Rajeev Satav
राजीव सातव

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नवनिर्वाचित सदस्यांनी सामाजिक अंतर पाळून शपथ घेतली. या सदस्यांना आपल्या सोबत  केवळ एक अतिथी आणण्याची परवानगी मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ सदस्य फौजिया खान यांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्या शपथविधीस उपस्थित राहू शकल्या नाहीत. ज्या सदस्यांचा शपथविधी आज होऊ शकला नाही त्यांचा शपथविधी पुढील संसद अधिवेशन काळात होईल.

Not finished yet': Udayanraje Bhosale after defeat in Lok Sabha ...
Priyanka Chaturvedi - Home | Facebook
प्रियंका चतुर्वेदी

महाराष्ट्रातील सहा सदस्यांसह देशभरातील अन्य नवनिर्वाचित राज्यसभा सदस्यांनीही शपथ घेतली यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ सदस्य मल्लिकार्जुन खर्गे, दिग्विजय सिंह, झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष तसेच माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन आणि  भारतीय जनता पक्षाचे ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही आज शपथ घेतली. राज्यसभेच्या 19 जागांसाठी जूनमध्ये निवडणुका घेण्यात आल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *