पंतप्रधानांनी सहाव्या भारत-जर्मनी आंतर-सरकारी बैठकीच्या पूर्ण सत्राचे सह-अध्यक्षपद भूषवले

नवी दिल्‍ली, २ मे  /प्रतिनिधी :-पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चॅन्सलर महामहीम  ओलाफ शोल्ट्झ यांनी भारत-जर्मनी आंतर-सरकारी बैठकीच्या  (IGC) पूर्ण सत्राचे अध्यक्षपद भूषवले.

आपल्या प्रारंभिक भाषणात दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या प्रमुख पैलूंवर तसेच प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर सामायिक दृष्टिकोन अधोरेखित केला. भारत-जर्मनी भागीदारी या गुंतागुतीच्या जगात यशस्वी  उदाहरण ठरू  शकते यावर पंतप्रधानांनी भर दिला. त्यांनी भारताच्या आत्मनिर्भर भारत मोहिमेत जर्मनीला  सहभागी होण्याचे  निमंत्रण  दिले.

सहाव्या भारत-जर्मनी आंतर-सरकारी बैठकी निमित्ताने स्वाक्षरी करण्यात आलेल्या करारांची यादी

अनु क्रकरारस्वाक्षरीकर्ता
भारताकडूनजर्मनीकडून
AT THE LEADER’S LEVEL
1.हरित आणि शाश्वत विकास भागीदारीवर संयुक्त घोषणापत्रपंतप्रधान नरेंद्र मोदीजर्मनीचे चॅन्सलर ओलाफ शोल्ट्झ
इतर करार
2.त्रयस्थ देशांमधील तिरंगी विकास सहकार्य प्रकल्पांच्या अंमलबजावणीवर संयुक्त घोषणापत्रपरराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकरआर्थिक सहकार्य आणि विकास मंत्री वेन्ज शुल्झ
3.वर्गीकृत माहितीची देवाणघेवाण आणि परस्पर संरक्षण आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय  आणि जर्मन परराष्ट्र कार्यालय यांच्यात थेट एनक्रिप्टेड कनेक्शन स्थापित करण्यासाठी कराराच्या स्थापनेबाबत संयुक्त घोषणापत्रपरराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकरपरराष्ट्र मंत्री ऍनालेना बेअरबॉक
4.भारत -जर्मन विकास सहकार्य बाबत नवीकरणीय ऊर्जा भागीदारीपरराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकरआर्थिक सहकार्य आणि विकास मंत्री वेन्ज शुल्झ
5.सर्वसमावेशक स्थलांतर आणि गतिशीलता भागीदारीवरील कराराच्या प्रारंभासंबंधी संयुक्त घोषणापत्रपरराष्ट्र सचिव विनय क्वात्रामहमुत ओझदेमिर, संसदीय गृह  सचिव, गृह मंत्रालय
6.भारतातील कॉर्पोरेट कार्यकारी अधिकारी  आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रगत प्रशिक्षणाच्या क्षेत्रात सहकार्य सुरू ठेवण्यावर संयुक्त घोषणापत्रअनुराग जैन, सचिव, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागराज्य सचिव उदो फिलिप, आर्थिक व्यवहार आणि हवामान कृती मंत्रालय
आभासी स्वाक्षऱ्या
7.भारत -जर्मन हरित  हायड्रोजन कृती दलआर.के. सिंह, ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रीरॉबर्ट हॅबेक, आर्थिक व्यवहार आणि हवामान कृती मंत्री
8.कृषि परिस्थितिकी बाबत संयुक्त घोषणापत्रनरेंद्र सिंह  तोमर, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रीआर्थिक सहकार्य आणि विकास मंत्री वेन्ज शुल्झ
9.फॉरेस्ट लँडस्केप रिस्टोरेशन  बाबत  संयुक्त घोषणापत्रभूपेंद्र यादव, पर्यावरण वने आणि हवामान बदल मंत्रीस्टेफी लेमके, केंद्रीय मंत्री, पर्यावरण, निसर्ग संवर्धन, आण्विक सुरक्षा आणि ग्राहक संरक्षण

दोन्ही बाजूंच्या सहभागी मंत्री आणि अधिकार्‍यांनी आयजीसीच्या विविध विषयांवरील  बैठकांचे संक्षिप्त अहवाल सादर केले:

  • परराष्ट्र व्यवहार आणि सुरक्षा.
  • आर्थिक, वित्तीय  धोरण, वैज्ञानिक आणि सामाजिक आदान -प्रदान
  • हवामान, पर्यावरण, शाश्वत विकास आणि ऊर्जा.

अर्थमंत्री  निर्मला सीतारामन; परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर; विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (IC) डॉ जितेंद्र सिंह; आणि डीपीआयआयटीचे सचिव अनुराग जैन यांनी भारताच्या वतीने  सादरीकरण केले.

हरित आणि शाश्वत विकास भागीदारी स्थापन कारण्याबाबत संयुक्त  घोषणापत्रावर पंतप्रधान आणि चॅन्सेलर शोल्ट्झ यांच्या स्वाक्षरीने पूर्ण सत्राचा समारोप झाला. या  भागीदारी अंतर्गत शाश्वत विकास उद्दिष्टे आणि हवामान कृतीवरील भारत-जर्मनी सहकार्यासाठी संपूर्ण सरकारी दृष्टिकोनाची कल्पना असून  जर्मनीने 2030 पर्यंत नवीन आणि अतिरिक्त विकास सहाय्यासाठी 10 अब्ज युरोची आगाऊ वचनबद्धता करण्यास सहमती दर्शविली आहे. या संयुक्त घोषणापत्रानुसार उच्च-स्तरीय समन्वय आणि राजकीय दिशा देण्यासाठी आयजीसीच्या  चौकटीत मंत्रिस्तरीय यंत्रणा स्थापन केली जाईल. .