केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांची चित्रप्रदर्शनास भेट

औरंगाबाद ,२ मे/प्रतिनिधी :- राज्य शासनाच्या द्वीवर्षपूर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय चित्रप्रदर्शनास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज भेट दिली.

जिल्हा परिषद इमारतीसमोरील सिमंत मंगल कार्यालयात चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या चित्रप्रदर्शनात शासनाने दोन वर्षात राबविलेल्या विविध योजना, उपक्रम,विकास कामांची सविस्तर माहिती सचित्र स्वरूपात लावण्यात आलेली आहे. या सर्व माहिती व चित्रांचे अवलोकन डॉ. कराड यांनी केले. यावेळी त्यांच्यासमवेत देवगिरी बँके व जलदूत संस्थेचे अध्यक्ष किशोर शितोळे, माजी महापौर बापूसाहेब घडमोडे आदींची उपस्थिती होती.