वैजापूर येथे रमजान ईद निमित्ताने ईदगाह मैदानाची साफसफाई

वैजापूर, २ मे  /प्रतिनिधी :-गत दोन वर्षात कोरोना महामारीमूळे रमजान ईदची नमाज  ईदगाह मैदानावर झाली नाही यावर्षी ईद ची नमाज ईदगाह मैदानावर होणार असल्याने केवळ शहरातीलच नव्हे तर आजूबाजूच्या खेड्यातील  मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने नमाज अदा करण्यासाठी ईद दिनी येतील ही अपेक्षा करून पालिकेच्या स्वछता विभागाच्यावतीने रविवारी ईदगाह मैदानाची साफसफाई करण्यात आली.

स्वछतादूत धोंडीरामसिंह राजपूत, पालिकेचे स्वछता निरीक्षक प्रमोद निकाळे, सहाय्यक रमेश त्रिभुवन, ईदगाह मैदानावर वास्तव्य करीत असलेले रशीदखान व स्वच्छता कर्मचारी वर्गाने ईदगाह मैदान झाडून स्वच्छ केले.या ईदगाह वर येण्याचा मार्ग ही स्वच्छ करण्यात आला.रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले असून नमाजसाठी आता हे मैदान तयार आहे.