रामाच्या अस्तित्वावर शंका घेणाऱ्यांशी तुम्ही सोयरीक केली-देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर घणाघात

”तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही”. महाराष्ट्रच नाव या सरकार ने बदनाम केलं असाही आरोप

मुंबई,१ मे/प्रतिनिधी :- ”रामाच्या अस्तित्वावर शंका घेणाऱ्यांशी तुम्ही सोयरीक केली” आम्हांला बाबरी पाडली असताना कुठे होतात असे विचारता पण गुन्हे आमच्याच नेत्यांवर दाखल झाले. असे असूनसुद्धा आम्ही बाबरी कार सेवकांनीच पाडली असे म्हणतो ते श्रेय आम्ही घेत नाही. मग तुम्ही कसे घेता असा सवाल फडणवीसांनी शिवसेनेला केला. आजचा दिवस छत्रपती शिवाजी महाराज ते लोकमान्य टिळकांपर्यंत सगल्याचे स्मरण करण्याचा आहे. प्रशासनाचा गैरसमझ आहे कि तेच हिंदुत्व व तेच महाराष्ट्र आहेत. भारताचा आधार म्हणजे महाराष्ट्र. ”तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही”. महाराष्ट्र चा नाव या सरकार ने बदनाम केलं असाही आरोप फडणवीसांनी केला.

‘म्हणून मी त्यांना वारंवार आठवण करुन देवून सांगतो, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. तुम्ही म्हणजे मराठी नाही. आणि आज हेही सांगायची वेळ आली आहे की, तुम्ही म्हणजे हिंदूही नाही. पण आज हे म्हणणार नाही. मला हिंदूंची संख्या कमी करायची नाही. पण मी एवढंच सांगतो तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही. हिंदुत्व ही एक अशी व्याख्या आहे जी जीवनपद्धत आहे, त्या जीवनपद्धतीने जगातील सगळ्या जु्न्या सभ्यतेच्या माध्यमातून संपूर्ण जगाला व्यापत असताना प्रत्येकाला जीवनाचा एक मार्ग दाखवला हे खरं हिंदुत्व आहे. तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही हे लक्षात ठेवा’ असं फडणवीसांनी सेनेला सुनावलं.

ज्यावेळी तुम्ही भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार करता त्यावेळी तुमचे सगळे साथी सवंगडी जेलमध्ये जातात त्यावेळी महाराष्ट्र बदनाम होतो. त्यावेळी महाराष्ट्राचं नाव संपूर्ण भारतात खराब होतं. त्यामुळे शरम वाटली पाहिजे. महाराष्ट्राच्या नावाला बट्टा लावण्याचं काम तुमच्या सरकारमध्ये होतंय. पण त्यांना वाटतं हेच महाराष्ट्र, मराठी आणि हिंदुत्व आहे, असा टोलाही फडणवीसांनी लगावला.

‘बाबरी मशीद पडली तेव्हा कुठल्या मेळाव्यात होते? असे ते विचारतात. कुणीतरी फार चांगला प्रश्न विचारला. मशिदींवरील भोंगे काढायला सांगितली तर यांची हातभर फाटली आणि सांगतात आम्ही बाबरी मशीद पाडली. बाबरी मशिद पााडली. हा देवेंद्र फडणवीस बाबरी मशीद पाडण्यासाठी होता. एवढंच नाही आधीच्या कारसेवेमध्ये याच राममंदिराकरता 18 दिवस पतायूच्या सेंट्रल जेलमध्ये या देवेंद्र फडणवीसने घालवले. लाठी, गोळी खाण्याचं काम आम्ही त्यावेळेस केलं. तुम्ही आम्हाला विचारचता बाबरी पाडली तेव्हा तुम्ही कुठे होता? खरं म्हणजे बाबरी मशीद पाडली तेव्हा महाराष्ट्रातला कुठला नेता तेव्हा तिथे गेला होता. खरं सांगा शिवसेनेचा एकही नेता त्याठिकाणी हजर नव्हता. बाबरी मशिद पडली किंवा तो ठाचा पडला तेव्हा कोणावर आरोप होते? 32 आरोपी होते. कोण होते 32 आरोपी? लालकृष्ण आडवाणी, डॉ. मुरलीमनोहर जोशी, कल्याण सिंग, उमा भारती, राम विलास वेदांती हे आरोपी होते’ असंही फडणवीस म्हणाले.

Image
भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील मुद्दे 

बाबरी आम्ही पडली. बाबरी मशिदीचा ढाचा पडला. तेव्हा एकही शिवसेनेचा नेता हजर नव्हता. मी तिथे हजर होतो. देवेंद्र फडणवीस तिथे होता. १८ दिवस सेंट्रल जेलमध्ये होतो आणि तुम्ही आम्हाला विचारता की तुम्ही कुठे होता? 

बाबरीचा ढाचा पडला तेव्हा एकूण ३२ आरोपी होते. कोण होते? ते सर्व भाजप नेते होते. यातील जयभानसिंग पवैय्या यांनी ३० वर्ष  तुरुंगात काढले. ते आज इथे आहेत. आम्हाला प्रसिद्धी करता येत नाही. का याचे कारणही ऐकून घ्या. 

बाबरी ढाचा पडला तेव्हा सर्वानी मिळून निर्णय घेतला. कुणी श्रेय घेण्याचे कारण नाही. जे कुणी काही केले असेल तर ते कार सेवकांनी केलेलं काम आहे असे असा निर्णय घेतला.

यावेळी कुठल्याही नेत्याला विचारले तर ते सांगायचे की कारसेवक यांनी पाडले. कल्याणसिंग यांना विचारले तेव्हा ते म्हणाले, की ३ हजार कारसेवकांवर गोळी कसे चालविणार. ते राम सेवक होते. त्यांच्यावे गोळी चालविली नाही तेच ठीक. 

पण आताचे सरकार पहा, ज्यांनी रामाला विरोध केला. राम निर्माण झाले होते का असा प्रश्न विचारला होता त्यांच्याच  मांडीला मांडी लावून बसले आहेत.

May be an image of 3 people and people standing

तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही, तुम्ही म्हणजे हिंदू नाही. हिंदुत्व म्हणजे अशी व्याख्या आहे की संस्कृतीच्या माध्यमातून प्रत्येक जीवांना मार्ग दाखविला तो मार्ग म्हणजे हिंदुत्व होय. 

तुम्ही ज्यावेळी भ्रष्ट्राचार करता त्यावेळी तुम्ही नाही तर महाराष्ट्र बदनाम होतो. महाराष्ट या नावाला बट्टा लावण्याचे काम करत आहेत.

हनुमान चालीसा म्हटली तर राजद्रोह होतो. ते राणा पतिपत्नी मुख्यमंत्री यांच्या घरासमोर जाऊन हनुमान चालीसा म्हटल्यावर त्यांच्यावर राज्य द्रोह केला. ते राज्य उलथवून टाकण्याची त्यांची त्तरो होती. आता हनुमान चालीसा म्हटल्याने कुणाचे राज्य जाईल. 

Image

रामाचे राजू उलथवले जाईल की रावणाचे. राज्य उलथविण्याचे काम करत आहेत असा आरोप करतात तर एकदा सांगा कि रामाच्या बाजूचे की रावणाच्या ? आरोपपत्र दाखल करतात.

आज पोलखोल सभा नाही १८ तारखेला सभा घेणार आहे. सभा घेण्यापूर्वी एकाने फोन केला गदाधारी हिंदुत्व, घंटांधारी हिंदुत्व.. उद्धवजी गदाधारी आहेत, ते म्हणाले तुम्ही चूक म्हणालात. हे रोज सकाळी टीव्ही उघडल्यानंतर गदा आमच्या दारी नाही तर गधा आमच्या दारी असे म्हणायला हवे होते.   

May be an image of 2 people, people standing and flower

मुख्यमंत्री याची मुलाखत झाली. किती दबाव आहे. अपेक्षा होती. महाराष्ट दिवस आहे काही विकासाचे बोलतील. पण तसे काहीच नाही. तेच टोमणे तेच शब्द, दंतकथा, भपका, थकवर, खेळ, बुद्धिबळ, मार्केटिंग, भोंगे पुंगी, माकडचाळे, उड्या, पोटदुखी, वाढणे, मरणे. लढणे, पीडित, चाकण, तमाशे, नौटंकी 

किमान आजच्या दिवशी तरी काही नवीन निर्णय घ्यायला पाहिजे होते. ५० हजार दिले का. लोड शेडींग सुरु आहे. आम्ही सत्तेत आलो तेव्हा महाराष्ट्र ५ व्या क्रमांकावर होता त्याला १ नंबरवर आणले. असे नेले कि आमच्यानंतरची चार राज्य मिळूनही ती प्रगती गाठू शकले नाही.

Image

आता आमचे पवारसाहेब म्हणतात, हनुमान चालीसा म्हटल्याने रोजगाराचे प्रश्न सुटणार आहेत का? पण रोजगाराचे प्रश्न इफ्तार पार्टी झोडल्यानेही सुटणार नाहीत.

कोरोना काळात कुणालाही मदत केली नाही. मदत कुणाला केली, मुंबीरच्या बिल्डरांना मदत केली. हजारॊ कोटींची स्टेम ड्युटी रद्द केली. त्या खालोखाल गरीब झाले बार चालक बेवडे यांची उपासमार होती. त्यामुळे त्याचा टॅक्स कमी केला. पेट्रोल, डिझेल याचा टॅक्स कमी नाही केला.

दारूड्यांकरता काम करता की सामान्य माणसाकरता काम करता. मुख्यमंत्री यांचं वर्क फ्रॉम होम माहित होत आता वर्क फ्रॉम जेल सुरु झालंय.