मराठवाड्यातील पहिल्या ‘महिला व बाल विकास’ भवनाचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते भूमिपुजन

परभणी,१ मे /प्रतिनिधी :- जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत परभणी जिल्ह्याकरीता महिला व बाल विकास भवन मंजूर झाले आहे. परभणी येथील वसमत रोडवरील जिल्हा ग्रंथालयाच्या शेजारी ‘महिला व बाल विकास भवन’ उभे राहणार असून या भवनाचे भूमिपुजन आज सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले.

May be an image of 8 people, people standing and outdoors

यावेळी खासदार संजय जाधव, खासदार डॉ. फौजिया खान सर्वश्री आमदार डॉ. राहूल पाटील, बाबाजानी दूर्राणी, जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, मनपा आयुक्त देविदास पवार, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कैलास तिडके यांची प्रमुख उपस्थिती होती.

महिला व बाल विकासाच्या अंतर्गत येणारी सर्व कार्यालये एकत्र स्थापन करुन महिला व बाल विकास विभागाच्या सर्व योजना एकाच ठिकाणी नागरिकांना उपलब्ध व्हाव्यात या हेतुने परभणी जिल्ह्यात ‘महिला व बाल विकास भवन’ ची स्थापना जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.