जनरल एम.एम. नरवणे लष्करप्रमुख पदावरून सेवानिवृत्त

नवी दिल्ली ,३० एप्रिल  /प्रतिनिधी :-जनरल एम. एम. नरवणे, PVSM, AVSM, SM, VSM, ADC आज आपल्या चार दशकांच्या कीर्तीवंत आणि नेत्रदीपक लष्करी सेवेतून निवृत्त झाले. कोविड-19 महामारीच्या काळात भारतीय लष्करातील अधिकाऱ्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी, याच काळात पूर्व लदाखमध्ये निर्माण झालेल्या संघर्षाला चोख आणि निश्चयी उत्तर देणारे,आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन देणारे त्याशिवाय, भविष्यातील युद्धाची तयारी करण्यासाठी, आधुनिक सज्जताही केली. त्यांच्या कारकीर्दीतील अशा महत्वाच्या टप्प्यांसाठी ते कायम , सर्वांच्या स्मरणात राहतील.  

जनरल नरवणे यांनी भारताच्या मित्र देशांशी असलेले संबंध सुधारण्यासाठी सैन्य मुत्सद्देगिरीला बळ दिले आणि भारताची सर्वंकष राष्ट्रीय शक्ती वाढविली.  त्यांच्या कार्यकाळात दिल्लीत सैन्याच्या मुख्यालयाचे पुनर्निर्माण झाले, त्यायोगे अधिक सुरळीत आणि एकत्रित निर्णयकर्ती संस्था तयार झाली. तिन्ही सैन्यादालांच्या तुकड्यांच्या तैनातीचे ते एक उत्साही समर्थक होते आणि तिन्ही सैन्यदलांच्या समन्वयात असलेल्या आव्हानांची त्यांना कल्पना होती. त्यांनी IBG च्या कार्यान्वयनाला चालना दिली. जनरल नरवणे हे सच्चे सैनिक होते आणि त्यांना लढाऊ तुकड्यांची काळजी होती. त्यांनी जम्मू आणि काश्मीर, पूर्व लदाख आणि ईशान्य भारतात आघाड्यांना अनेकदा भेट दिली आणि एप्रिल 2020 नंतर पूर्व लदाख मध्ये नव्याने तैनात करण्यात आलेल्या तुकड्यांच्या राहण्याची सोय करण्याच्या कामाला गती दिली.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे आणि भारतीय लष्करी अकादमीचे माजी विद्यार्थी असलेले मनोज नरवणे, यांनी आपल्या लष्करी सेवेची सुरुवात जून 1980 साली शीख लाईट इन्फट्री रेजिमेंटमधून केली. ते वेलिंगटन च्या  डिफेन्स सर्विसेस कॉलेज आणि महू इथल्या हायर कमांड कोर्सचे माजी विद्यार्थी आहेत.

नारवणे डिफेन्स अभ्यासक्रमाचे द्वीपदवीधर आहेट्, तसेच  संरक्षण क्षेत्रातील एम. फील. डिग्री आणि व्यवस्थापन क्षेत्रातील पदवी देखील आहे. सध्या ते डॉक्टरेट करत आहेत.