काँग्रेसच्या पक्षप्रतोदपदी आ.राजेश राठोड यांची नियुक्ती

जालना,२९ एप्रिल  /प्रतिनिधी :- महाराष्ट्र विधान परिषदेच्या काँग्रेस पक्षप्रतोदपदी आ. राजेश राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधानमंडळ काँग्रेस पक्षाच्या दि. 26 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत विधीमंडळ काँग्रेस पक्षनेते तथा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आ. राजेश धोंडीराम राठोड यांची विधान परिषद काँग्रेस पक्षाच्या “पक्षप्रतोद” पदी नियुक्ती केल्याची घोषणा केली.
आ. राठोड हे विधान परिषद सदस्य असून यापूर्वी जालना जिल्हा परिषदेचे सभापती, युवक काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी, जालना जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी चांगले  काम केलेले आहे. आ. राजेश राठोड हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे विद्यमान सरचिटणीस असून महाराष्ट्रातील बंजारा समाजाचे नेते म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या निवडीचे काँग्रेस पक्षातील आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मित्र परिवारातून स्वागत करण्यात येत आहे.