कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 23 जुलैच्या मध्यरात्री पर्यंत संचारबंदीत वाढ
नांदेड जिल्ह्यात 51 बाधितांची भर
नांदेड दि. 20 :- कोराना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणुची साखळी तोडण्यासाठी व खबरदारीचा उपाय म्हणून गुरुवार 23 जुलै 2020 रोजी मध्यरात्री पर्यंत संचारबंदीत वाढ करण्यात आली आहे. तर आदेशातील अटी व शर्तीच्या अधिन राहून (मिशन बिगीन अगेन) नुसार जिल्ह्यात शुक्रवार 24 जुलैपासून सोमवार ते शुक्रवार यादिवशी दुकाने व इतर खाजगी आस्थापना चालू ठेवण्यास जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मुभा देण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव व रुग्णांाची संख्याि विचारात घेता जिल्हपयात कोरोना विषाणूंची साखळी तोडण्याोसाठी व खबरदारीचा उपाय म्हाणून अटी व शर्तीच्या अधिन राहून संपूर्ण नांदेड जिल्हूयात 12 जुलै 2020 रोजी मध्य्रात्री पासून ते 20जुलै 2020 च्यास मध्यजरात्री पर्यंत संचारबंदी लागू करण्याकत आली होती. परंतू नांदेड जिल्ह यात कोरोना विषाणू बाधित रुग्णत संख्याज झपाटयाने वाढ होत असल्याने या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यांच्याब अनुषंगाने संचारबंदीत वाढ करणे आवश्यसक होते.
जिल्ह्यात आज 20 जुलै रोजी सायं. 6 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 51 व्यक्ती बाधित झाले. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 33 तर अँटीजेन टेस्ट किट तपासणीद्वारे 18 बाधित आहेत. 15 व्यक्ती आज बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या एकूण 332 अहवालापैकी 223 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 986 एवढी झाली असून यातील 515 एवढे बाधित बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. 423 बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील 31 बाधितांची संख्या गंभीर स्वरुपाची आहे. यात 17 महिला व 14 पुरुषांचा समावेश आहे.
19 जुलै रोजी हिंगोली नाका नांदेड येथील 64 वर्षाची एक महिला तर देगलूर नाका येथील 65 वर्षाच्या एका पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. यांना उच्च रक्तदाब, मधुमेह व श्वसनाचे इत्यादी आजार होते. सोमवार 20 जुलै रोजी नायगाव येथील 26 वर्षाच्या एका महिलेचा शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. महिलेस किडनीचा गंभीर आजार होता. दोन दिवसात एकुण 3 मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत्त व्यक्तींची संख्या 49 एवढी झाली आहे. यात 42 मृत्यू हे नांदेड जिल्ह्यातील असून उर्वरीत 7 मृत्यू हे इतर जिल्ह्यातील आहेत.
लवकरच 5 हजार अँटिजेन किट्स
नांदेड जिल्ह्यातील कोरोनाची साखळी खंडित व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे व्यापक प्रयत्न केले जात आहेत. कोरोना-19 आजाराचे लवकरात लवकर निदान व्हावे यासाठी शासनाने पूर्वी 500 अँटिजेन टेस्ट किट्स उपलब्ध करुन दिल्या होत्या. या किट्समुळे सुमारे 1 तासात रुग्णांची टेस्ट हाती लागत असल्याने कोरोना व्यवस्थापनाच्यादृष्टिने ही एक मोठी उपलब्धी तपासणीच्यादृष्टिने आहे. या तपासणी किट्सचे वैशिष्ट्ये लक्षात घेता सुमारे 5 हजार ॲटिजेन टेस्ट किट्स उपलब्ध करुन देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून हे किट्स येत्या तीन ते चार दिवसात जिल्ह्याला उपलब्ध होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.