‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये पक्ष्यांसाठी अन्न व पाणी देण्याचा उपक्रम

नांदेड ,२८ एप्रिल  /प्रतिनिधी :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे निमित्त साधून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील औषधनिर्माणशास्त्र संकुलामध्ये पक्ष्यांसाठी अन्न व पाण्याचा उपक्रम राबविण्यात आला.  

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले आणि संकुलातील इतर प्राध्यापकांच्या हस्ते हा उपक्रम घेण्यात आला. संकुलातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी स्वखर्चातून पक्षांसाठीहा उपक्रम घेतला. यावेळी संकुलाचे संचालक डॉ. शैलेश वाढेर, डॉ. संजय पेकमवर,डॉ. सुरेंद्र गट्टाणी, डॉ. संतोष बुटले, डॉ. राजेश्‍वर क्षिरसागर, डॉ. राज मुन, डॉ. शैलेश पटवेकर, डॉ. राजेश्वर कल्याणकर, डॉ. विजय नवघरे, डॉ. रामेश्वर घोळवे, भगवान सुपेकर, शिवराज शिवपुजे, वर्षा कदम, निशा केंद्रे, वैशाली शेळके, आरती मोरे,प्रणाली कल्याणकर, मेघा गाजले यांच्यासह संकुलातील बी. फार्म व एम.फार्म चे विद्यार्थी उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहा. प्राध्यापक निशा दरगड व प्रिया देशमुख यांनी परिश्रम घेतले.