वैजापूर बाजार समितीत “ई-नाम” योजनेसंदर्भात शेतकरी मेळावा

वैजापूर,२७ एप्रिल  /प्रतिनिधी :- कृषी उत्पन्न बाजार समिती वैजापूरच्यावतीने अन्नदाता देवोभव – किसान भागीदारी प्राथमिकता हमारी या मोहिमेअंतर्गत मंगळवारी शेतकरी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला शेतकरी व व्यापाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
बाजार समितीच्या कांदा मार्केट येथे आयोजित या शेतकरी मेळाव्यात ई-नाम (राष्ट्रीय कृषी बाजार योजना), शेतकरी भागीदारी संस्था (एफपीओ) स्थापन करणे यासह कृषी पणन सुविधा या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या शेतकरी मेळाव्यास बाजार समितीचे सभापती भागीनाथराव मगर, संचालक कैलासचंद बोहरा,बद्रीअण्णा गायकवाड, कृषी पणन मंडळाचे केशव चव्हाण, शेतकरी बाबासाहेब वैद्य(लाख),रवींद्र निकम(गोयगांव),कारभारी कराळे( टाकळीसागज), बाजार समितीचे पी.के.मोटे, एस.के.निकम, वाय.एस.हाडोळे, चंचल ए.मते, अजीम शेख,योगेश मगर, निलेश खंडागळे, मंडी अनेलिसीस योगेश गायकवाड यांच्यासह शेतकरी व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.