वैजापूर ग्रामीण -2 मध्ये 10 लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे आ.बोरणारे यांच्या हस्ते लोकार्पण

वैजापूर,२६ एप्रिल  /प्रतिनिधी :- वैजापूर ग्रामीण -2 मधील धरणग्रस्त नगर व परमपूज्य दत्तगिरी महाराज आश्रम परिसरात  कंपाऊंड व गेट बसविण्यासाठी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या निधीतून करण्यात आलेल्या कामाचे लोकार्पण आमदार रमेश पाटील बोरणारे यांच्या हस्ते मंगळवारी झाले.


याप्रसंगी माजी नगराध्यक्ष साबेर खान, उपविभागीय आधिकारी माणिक आहेर , तहसीलदार राहुल गायकवाड, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप,तालुकाप्रमुख सचिन वाणी, शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती.आ.रमेश पाटील बोरणारे, मा.नगराध्यक्ष साबेर खान यांची यावेळी भाषणे झाली. शासनाच्या विविध विकास योजनांतून तसेच स्थानिक विकास निधीतून तालुक्याच्या विकासासाठी आतापर्यंत 250 कोटींचा निधी उपलब्ध करून घेतला असून तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी आपण कटिबध्द असल्याचे आ.बोरणारे यावेळी म्हणाले.  शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख भाऊसाहेब पाटील गलांडे,पोलीस पाटील गुलाबआप्पा साळुंके, युवासेना शहरप्रमुख श्रीकांत पाटील साळुंके, बाबूराव वाणी, गोपालदास आसर, काशिनाथ गायकवाड, कचरू पाटील भोसले, खंडू पाटील गाढे, उपशहरप्रमुख कपिल खैरे, राजू वाणी, अमोल पाटील बोरणारे, शिवाजी साळुंके, शिवलिंगआप्पा साखरे, विजय पाटील वाणी, रवी वाणी, बंडू वाघ यांच्यासह परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित होते.