राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ; राजद्रोहाचा गुन्हा दाखल

मुंबई ,२४ एप्रिल /प्रतिनिधी :- सामाजिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली १५३ अ अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर खार पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांला शनिवारी अटक केली होती. त्यानंतर आज रविवारी न्यायालयात हजर केल्यावर राणा दाम्पत्यावर १२४ अ अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला असून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अशी माहीती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली. दरम्यान न्यायालयाने त्यांचा जामिन अर्ज फेटाळून दोघांच्या जामिनावर २९ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.

सुनावणीच्या सुरुवातीला सरकारी वकीलाकडून राणा दाम्पत्याच्या सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. अॅड रिझवान मर्चंट आणि अॅड वैभव कृष्णा यांनी रवी राणा आणि नवनीत राणांची बाजू मांडली तर प्रदीप घरत यांनी सरकारची बाजू मांडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकार विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी देशद्रोहाचे कलम लावण्यात आला आहे.