इनरव्हील क्लब ऑफ जालना सेंट्रलने केले छत्र्यांचे वाटप

जालना,२४ एप्रिल  /प्रतिनिधी :-
जालना शहरातील फळ आणि भाजी विक्रेता महिलांना इनरव्हील क्लब जालना सेंट्रलने उन्हापासून संरक्षण करण्यासाठी छत्र्या दिले. चमनजवळील भाजी मार्केट, नूतन वसाहत, मामा चौक, मंठा चौफुली, दुर्गामाता रोड येथील बत्तीस महिलांना छत्र्या देण्यात आल्या. या वेळी त्या महिलांनी त्यांची मदत केल्याबद्दल इनरव्हील क्लबचे आभार मानले.

या वेळी अध्यक्ष  रश्मी गिंदोडिया, सचिव  पूनम जैन, संगीता मोतीवाला, डॉ. सोनाली जेथलिया, अनघा देशपांडे, वैशाली मत्सावार, पूनम सोनी, संगीता खिवंसरा हे उपस्थित होते.

इनरव्हील सोलार लाइट्स

नवीन मोंढ्याच्या जवळील बस्तीमध्ये रात्री अंधारात घरी जाण्यासाठी नागरिकांना खूप त्रास होत असे त्यामुळे इनरव्हील क्लब ऑफ जालना सेंट्रलने तीन ठिकाणी सोलार लाइट्स बसवून दिले. या वेळी अध्यक्ष   रश्मी गिंदोडिया, सचिव  पूनम जैन, संगीता मोतीवाला, डॉ. सोनाली जेथलिया, वैशाली मत्सावार, पूनम सोनी, संगीता खिवंसरा हे उपस्थित होते.