औरंगाबादेत सर्वाधिक ३९९ कोरोनाबाधित,१८४ व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण

औरंगाबाद:जिल्ह्यात रविवारी दिवसभरात आतापर्यंतचे सर्वाधिक ३९९ करोनाबाधित आढळून आले. यामध्ये शहरातील ३६०, तर ग्रामीण भागातील ३९ बाधितांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या १० हजार ८०३ झाली आहे. पैकी ६१४१ बाधित हे करोनामुक्त झाले आहे, तर आतापर्यंत ३९६ बाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच सध्या ४२६६ बाधितांवर उपचार सुरु आहेत.रविवारी औरंगाबाद जिल्ह्यात १८४ व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. 

लॉकडाऊनच्या नंतर शहरातील सगळे व्यवहार सुरळीतपणे सुरु करण्याच्या दृष्टीने महापालिकेने शनिवारपासून (18 जुलै) व्यापाऱयांची अँटीजेट टेस्ट करणे सुरु केले आहे. औरंगाबाद महानगरपालिकेने दुकान उघडण्यासाठी व्यापाऱ्यांना कोरोनामुक्त असल्याचे प्रमाणपत्र अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात अँटीजेन टेस्ट वाढवणार असल्याचे औरंगाबादचे आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले होते.आज पहिल्याच दिवशी औरंगाबादमध्ये १८४ व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. शनिवारीही ८४ व्यापाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.यामध्ये चिकन, मटण आणि किराणा मालाची दुकाने चालवणाऱ्या अनेक व्यापाऱ्यांचा समावेश आहे. सध्या शहरात १५ ठिकाणी व्यापारी संघाने निश्चित केलेल्या ठिकाणी कोरोनाच्या टेस्ट सुरु आहेत.त्यामुळे येणाऱ्या काळात औरंगाबादमधील कोरोना पॉझिटिव्ह व्यापाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

महापालिका हद्दीत ३६० बाधित

शहरातील बाधितामध्ये जालान नगर येथील १, अक्षदपुरा १, अल्ताफ कॉलनी, गारखेडा १, आंबेडकर नगर १, एन-नऊ सिडको १, खारा कुआँ १, श्रेयनगर १, हेली बाजार परिसर १, मुकुंदवाडी १, जवाहरनगर पोलिस ठाणे परिसर १, एन-१२, विवेकानंद नगर १, तर लक्ष्मी नगर, गारखेडा १, नेहरु नगर, कटकट गेट १, सिल्कमिल कॉलनी १, उदय कॉलनी, भोईवाडा १, राम नगर १, हर्ष नगर २, बीड बायपास, सातारा परिसर ३, हनुमान नगर ३, म्हाडा कॉलनी १, राम नगर १ सादात नगर १, गजानन नगर ५, पीर बाजार, उस्मानपुरा ४, राम नगर १०, विद्युत कॉलनी ९, हडको कॉर्नर १, राज नगर २, बीड बायपास १, सातारा गाव १, एन-पाच सिडको १, कांचनवाडी १, बन्सीलाल नगर १, शिवाजी नगर १, प्रताप नगर १, पदमपुरा ३, कोविड केअर सेंटर, किल्ले अर्क ६, छत्रपती नगर २, दशमेश नगर २, क्रांती चौक २, एन-दोन सिडको १, नारेगाव १, एन-चार हनुमान नगर १, सिडको १, टीव्ही सेंटर ३, चिकलठाणा १, गजानन नगर १, बीड बायपास २, ख्रिस्त नगर ३, छावणी परिसर २, कांचनवाडी १, विटखेडा १, मुकुंदवाडी १, रेल्वे स्टेशन परिसर १, ज्ञानेश्वर नगर, उल्कानगरी १, एमआयडीसी चिकलठाणा १, हमीद कॉलनी, बीड बायपास १, एन-सहा, सिडको २, आरेफ कॉलनी १, गुरू नगर २, एम-दोन, सिडको ३ आदी भागातील रहिवाशांचा समावेश आहे.

ग्रामीण भागात ३९ बाधित

ग्रामीण भागातील बाधितांमध्ये पोखरी येथील १, एमआयडीसी परिसर, बजाज नगर १, सरस्वती सोसायटी, बजाज नगर १, एसटी कॉलनी, बजाज नगर १, वडगाव १, बजाज नगर १, डोंगरगाव कावड १, बाभुळगाव २, आळंद, फुलंब्री २, शिक्षक कॉलनी, गोंदेगाव १, एन्ड्युरन्स कंपनी परिसर २, बोरगाव, गंगापूर १, विटावा, गंगापूर १, संत नगर, सिल्लोड १, जामा मशीद परिसर, सिल्लोड १, केळगाव, सिल्लोड १, टिळक नगर, सिल्लोड १, वैजापूर ५, कसाबखेडा, खुलताबाद १, देवगिरी सोसायटी, बजाज नगर १, हनुमान नगर, रांजणगाव १, सावता नगर, रांजणगाव १, रांजणगाव ग्रामपंचायत परिसर १, चित्तेगाव १, कन्नड ४, टिकाराम तांडा, कन्नड १, तेलवाडी, कन्नड २, मोहर्डा तांडा, कन्नड २, पियूषविहार आनंदजनसागर, बजाज नगर २, साई रेसिडेन्सी परिसर, सिडको महानगर १, रांजणगाव १, राजापूर, पैठण १, पवन नगर, रांजणगाव १, फुलंब्री ४ आदी ठिकाणच्या बाधितांचा समावेश आहे.

4 कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत सादात नगरातील 38 आणि गजानन कॉलनीतील 42 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.घाटीत जटवाडा रोडवरील राधास्वामी कॉलनीतील 65 वर्षीय स्त्री, तर एका खासगी रुग्णालयात एसटी कॉलनीतील 30 वर्षीय कोरोनाबाधित महिला रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *