इती, मती,रतीत श्रीकृष्ण असल्यास सद् गती प्राप्त होते: आचार्य मृदुल कृष्ण गोस्वामी

तृतीय पुष्प: भागवत कथा हरिनामात भावीक तल्लीन 

जालना,२३ एप्रिल  /प्रतिनिधी :- संसार हा स्वार्थाने भरलेल्या असून ज्याचे लक्ष श्रीकृष्णात  आहे. ज्याच्या मनी केवळ श्रीकृष्ण असुन मनात श्रीकृष्णा विषयी प्रेम भाव असेल त्यास कधीच दुर्गति न मिळता सदैव सद् गती प्राप्त होते. असे भगवान श्रीकृष्ण भक्तीचे महात्म्य आचार्य मृदुलकृष्ण गोस्वामी यांनी आज विषद केले.

 गायत्री मंदिर परिसरातील वृंदावन धाम येथे हरे कृष्णा सत्संग समितीच्या वतीने सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यात आचार्य मृदुल कृष्ण गोस्वामी यांनी ” कपिल- देव हूती संवाद ,सती व ध्रुव चरित्रांवर ” तृतीय पुष्पाचे विमोचन केले.

प्रारंभी  मुख्य यजमान कश्मीरीलाल अग्रवाल, कथेचे महासचिव अंकुशराव राऊत, सत्संग समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी,गोपाल गोयल सी.ए.गोविंद प्रसाद मुंदडा, अनिल सोनी,मेघराज चौधरी, मनिष तवरावाला,  आचार्य सत्यनारायण व्यास, विष्णू पाचफुले, इंदर गौरक्षक, दिनेश पाटील, महेंद्र भाटिया, जीवन सले, गणेश घुगे ,श्रावण भुरेवाल, विशाल दिपवाल, सतीश जाधव, महेश भालेराव, नीरज जैन, मनोज झंवर, परेश रायठठ्ठा,रवि अग्रवाल, संदीप गोयल, पवन जोशी , अर्जुन बजाज,  गोविंद राठी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली . 

तृतीय पुष्प गुंफताना आचार्य  मृदुलकृष्ण गोस्वामी यांनी “राधे गोविंद भजो,,,,राधे ,,,गोविंदा…” या संगीतमय भजनाने श्रोत्यांमध्ये  स्फूर्ती निर्माण केली. ” पितामह भीष्मांनी अंतिम क्षणी केलेले श्री कृष्णाचे वर्णन, परीक्षीताचा राज्यकारभार, महाराज शुकदेवांच्या मुखातून ऐकलेले भागवत, भगवंताने सृष्टीची निर्मिती करताना प्रथम ब्रह्मदेव, त्यांचे चार पुत्र, ब्रह्मदेवांनी केलेली मनू ची निर्मिती, कर्दम- देवभूती विवाह, कपिल ने माता देवभूतीस  संत सेवा, सत्संगाचे पटवून दिलेले महत्त्व,  पार्वती माता सती व ध्रुव  चरित्रांचे”  विविध संदर्भासह त्यांनी सविस्तर विवेचन करत  आचार्य मृदुल कृष्ण गोस्वामीजी यांनी अधून – मधून संगीतमय भजनांद्वारे उपस्थित भाविकांना हरिनामात तल्लीन केले. मंत्र जप केल्याने सर्व बाजूंनी सुरक्षा मिळते,  काही क्षण श्वास थांबतो व मनुष्य प्राणी दीर्घायुष्यी होतो. असे नामजपाचे महत्त्व त्यांनी सांगितले. 

” नाम हे मनाचे स्नान असून ऱ्हदय रूपी अंगणात श्रीकृष्णास बसवावे, भगवंताच्या चरणी वज्र, अंकुश, ध्वजा व कमल असून चरण ते मुखापर्यंत भगवंतांचे ध्यान केल्यास मनरूपी भूत वश होते आणि यश, कीर्ती सर्वत्र दरवळते “असे आचार्य मृदुल कृष्ण गोस्वामी यांनी नमूद केले. यावेळी पुनमचंद जेथलिया, विनोद पांडे, मुन्ना गजबी, रामेश्वर जोशी ,राजेंद्र सारस्वत, मनोज शर्मा, विजय राठी, रामनिवास गौड, मनोज दायमा, योगेश ठक्कर, रामप्रसाद मुंदडा, सुभाष कोटुरवार, गेंदालाल झुंगे, विनोद पवार, प्रकाश जायभाये यांच्यासह महिला व भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.