वैजापूर तालुक्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 57 लाख 41 हजार रुपयांच्या कामांचे आ.बोरणारे यांच्या हस्ते भूमीपूजन

वैजापूर,२२ एप्रिल  /प्रतिनिधी :- वैजापूर-गंगापूर विधानसभा मतदारसंघासाठी राज्य सरकारच्या पाणीपुरवठा विभागाकडून जलजीवन मिशन योजनेसाठी 30 कोटी 30 लाख 41 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून मंजूर झालेल्या या निधीपैकी वैजापूर तालुक्यातील हनुमंतगाव, नादी, म्हस्की, गोयेगाव, भऊर व नारायणपूर या गावातील 57 लाख 52 हजार रुपये निधीच्या जलजीवन मिशन योजनेच्या कामांचे भूमिपूजन आमदार  रमेश पाटील बोरणारे यांच्याहस्ते शुक्रवारी करण्यात आले.
या प्रसंगी माजी  नगराध्यक्ष साबेर खान, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुकाप्रमुख सचिन पाटील वाणी, माजी तालुकाप्रमुख खुशालसिंग राजपूत, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रामहरी बापू जाधव, पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश पाटील हिंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. रमेश पाटील बोरणारे, माजी नगराध्यक्ष साबेर खान यांची यावेळी समयोचित भाषणे झाली. याप्रसंगी उपकार्यकारी अभियंता कोयलवार , कल्याण पाटील जगताप, भाऊसाहेब पाटील गलांडे, विभागप्रमुख नानासाहेब थोरात, उपविभागप्रमुख सुनिल कारभार, बंडू पा गायकवाड, मा जि प सदस्य कैलास आबा सुरासे,  बाजार समितीचे संचालक रावसाहेब पाटील जगताप, रावसाहेब पाटील मोटे, सरपंच नंदू हारदे, सुनिल जगताप, जालिंदर थोरे, कोंडीराम सोमवंशी, भगवान सोमवंशी, काशीनाथ सोमवंशी, प्रभाकर मते, गणेश निकोले, सुदाम तात्या खिल्लारे, नानासाहेब  साठे, दिलीप भांडे, शिवाजी भांडे, रमेश पा चोभे, सुनिल भांडे, कारभारी पा जाधव, शंकर मामा तनपुरे, उपसरपंच पाशुभाई, प्रमोद तुरकने, आप्पासाहेब पवार, छगन सावंत, दत्तुभाऊ सावंत, जितेंद्र  जगताप, गोरखनाथ वाळुंज गणेश मोटे, राजू गलांडे, योगेश मोहीते, रामकृष्ण शिंदे, नवनाथ मोटे, सुभाष खैरनार, पंढरीनाथ मतकर, भगिनाथ मतकर, नवनाथ ठोंबरे, दत्तु ठोंबरे, अशोक ठोंबरे,  पंढरीनाथ चोभे, वेणूनाथ फाळके, संपत फाळके, लक्ष्मण तनपुरे, बाबासाहेब  तनपुरे, अनिल सोमवंशी, विजय सोमवंशी, प्रकाश आहेर, अमोल मोटे, कैलास फाळके, नंदू चोभे, रंगनाथ फाळके, ज्ञानदेव फाळके, नामदेव त्रिभुवन, बाबूलाल भडके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.