‘राष्ट्रीय जंतनाशक दिन’ मोहिमचे आयोजन

औरंगाबाद,२१ एप्रिल  /प्रतिनिधी :- राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेचे आयोजन औरंगाबाद जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. सदर राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम 25 एप्रिल 2022 तर मॉप अप दिन 27 एप्रिल 2022 रोजी राबिण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 1 ते 6 वर्ष वयोगटातील 2 लक्ष 61 हजार 961 लाभार्थी आहेत व 6 ते 19 वयोगटातील 5 लक्ष 55 हजार 813 लाभार्थी आहेत असे एकूण लाभार्थी 8 लक्ष 17 हजार 774 आहेत.

            1 ते 19 वयोगटातील लाभार्थ्यांना अल्बेंडेझॉल ची गोळी (जंतनाशक) देण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत 1 ते 19 वर्ष वयोगटातील सर्व शाळेय विद्यार्थ्यांना शाळा अंगणवाडी केंद्र स्तरावर गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती व जीवनाचा दर्जा उंचावणे हा राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश आहे. ही त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती व जीवणाचा दर्जा उंचावणे हा राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश आहे. ही  मोहिम जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. तसेच दि.25 एप्रिल 22 ते 02 मे 22 या कालावधीत शाळा बाह्य मुलांकरीता आशा कार्यकर्ता मार्फत सदर गोळ्या घरी जाऊन देण्यात येणार आहे.

            या मोहिमेंतर्गत 1 ते 2 वयोगटातील मुला-मुलीसाठी 200 मिलिग्रॅमची गोळी चुरा पावडर करुनच पाण्याबरोबर देण्यात येईल. तसेच 2 ते 19 वयोगटातील मुला-मुलींना 400 मिलिग्रॅमची गोळी चुरा अथवा तुकडे करुन चावून खाण्यास स्वच्छ पाण्याबरोबर देण्यात येणार आहे. अल्बेंडेझॉलची गोळी उपाशीपोटी देण्यात येणार नाही. गोळी खाल्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाही. जंताचा प्रादूर्भाव असल्यास किरकोळ पोटदुखी, जळजळ अथवा क्वचित प्रसंगी मुलांना उलटी होऊ शकते. हे दुष्परिणाम किरकोळ स्वरुपाचे असल्याने पालकांनी घाबरुन जाऊ नये. असे आवाहन  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके जिल्हा परिषद यांनी केले आहे.