राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी औरंगाबाद संघ जाहीर

औरंगाबाद ,१९ एप्रिल  /प्रतिनिधी :- लातूर येथे होणाऱ्या मुलांच्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी औरंगाबाद संघाची घोषणा शहर संघटनेचे सचिव पंकज भारसाखळे यांनी केली.

विभागीय क्रीडा संकुलाच्या बॉक्सिंग हॉलमध्ये नुकत्याच झालेल्या निवड चाचणी स्पर्धेतून औरंगाबाद शहराचा बॉक्सिंग संघ निवडण्यात आला. विविध गटात विजयी  ठरलेला खेळाडूंचा औरंगाबाद शहर बॉक्सिंग संघात समावेश करण्यात आला असून त्यात ४६-४८ किलो: राम पाचपीडं, ५४-५७ किलो: अमोल गायकवाड, ६०-६३ किलो: प्रतीक मनगटे, ६७-७१ किलो: प्रथमेश बेरड, ७१-७५ किलो: रोहित आंबेकर, ८०-८६ किलो: पियुष तुपे, ८६-९२ किलो: सुफियान शेख यांचा समावेश आहे. तर संघाच्या प्रशिक्षकपदी राहुल टाक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.