औरंगाबादेत रविवारपासून बाजारपेठा सुरु ,चाचणीचे तीनतेरा

दोन टप्प्यांमध्ये होणार व्यापारी, दुकानदारांची कोरोना चाचणी

औरंगाबाद:नऊ दिवसाच्या संचारबंदी नंतर आजपासून सर्व बाजारपेठ खुली होत आहे.करोना आजाराच्या रुग्ण वाढीची साखळी तोडण्यासाठी औरंगाबाद शहरात 10 ते 18 जुलै दरम्यान संचारबंदी पुकारण्यात आली आहे. संचारबंदीचा आज शनिवार हा शेवटचा दिवस होता. रविवारपासून सगळे व्यवहार सुरळीत सुरु होणार आहेत.

अँटीजन टेस्ट न करता दुकाने उघडली तर गुन्हे दाखल होतील, या इशाऱ्यामुळे सर्वसामान्य व्यापाऱ्यामध्ये चांगलीच घबराट पसरली होती. त्यामुळे टेस्ट करण्यासाठी टीव्ही सेंटर, जुना मोंढ्यासह अन्य केंद्रावर व्यापाऱ्यांनी तोबा गर्दी केली.संचारबंदी उघडण्याची प्रक्रिया टप्या टप्याने करावी लागेल. याबाबत व्यापाऱ्यांशी चर्चा सुरू असून पी वन पी टु पुढील 3 दिवस लागू असणार आहे.दुकानाची वेळ 7 ते 7 हीच असेल.मद्यविक्री आँनलाईन सुरू राहणार असून अजून मंदिरे उघडणार नाहीत. तरी नागरिकांनी बाहेर गर्दी करू नये.घरात राहावे आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, तरच आपण वाढता संसर्ग रोखण्यात यशस्वी होऊ. तसेच या संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर बकरी ईद घरीच राहून शांततेत साजरी करावी,असे आवाहन करून जिल्हाधिकारी यांनी संचारबंदीला जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.

व्यवसाय सुरु करण्यापूरवी शहरातील सगळ्या व्यापाऱयांनी अँटीजेन टेस्ट करणे गरजेचे आहे. जे व्यापारी ही टेस्ट करणार नाहीत, त्यांच्यावर एफआयआर दाखल केला जाईल असा इशारा महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिला होता. त्यामुळे व्यापारी संभ्रमात होते. शनिवारी दुपारी साडेबारा वाजता महापालिका मुख्यालयात प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीला मराठवाडा चेंबरचे अध्यक्ष प्रफुल्ल मालाणी, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे,लक्ष्मीनारायण राठी, अजय शहा, गोपाल पटेल, विजय जैस्वाल,कचरु वेळंजकर, संजय कांकरिया, जयंत देवळाणकर, कृषी उत्पन्न बाजार समिती, फळ विक्रेते, चिकन – मटन विक्रेत्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने संचारबंदीनंतर भाजीपाला, फळ, दूध, मांस, विक्रेते आणि किराना दुकानदार व त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोविड १९ टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. व्यापारी, दुकानदार, कर्मचाऱ्यांची गर्दी होऊ नये यासाठी दोन टप्प्यांमध्ये व्यापारी, दुकानदारांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी घेतला आहे.कोरोना तपासणी करण्यासाठी औरंगाबाद व्यापारी महासंघाचे पदाधिकारी, भाजीपाला विक्रेत्यांच्या संघटना आणि नोडल आॅफीसर यांनी नियोजन करून कोरोना तपासणी करण्याची ठिकाणे निश्चित करण्यात येणार आहे. कोरोना तपासणीसाठी महापालिकेच्या वतीने अ‍ॅटीजेन टेस्ट किटची व्यवस्था करण्यात येणार आहे. सहा वर्गवारीतील विक्रेते आणि त्यांच्याकडे काम करणारे कर्मचारी यांनी टेस्ट करण्यासाठी पुरेशी उपाययोजना करण्यात आली आहे. दरम्यान, मनपाने ३१ मे २०२० रोजी घेतलेल्या निर्यणानुसार सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पी-१ आणि पी-२ पध्दतीने दुकाने उघडी राहणार आहे़ कोरोना टेस्ट न करणाऱ्या शिवाय निगेटिव्ह प्रमाणपत्र जवळ न ठेवणाऱ्या व्यापारी, दुकानदारांविरूध्द दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात यांची होणार तपासणी

भाजी पाला विक्रेते, किराणा दुकानदार, दुध विक्रेते, अंडी, चिकन, मटन, मांस विक्रेते, बेकरी (ब्रेड आदी.) उत्पादक विक्रेते, केशकर्तनालये (सलून) या सर्वांची पहिल्या टप्प्यांमध्ये १८ ते २४ जुलै या कालावधीत कोरोना तपासणी करण्यात येणार आहे. या सर्वांची कोरोना तपासणी करण्यासाठी १५ मोबाईल टिम नियुक्त करण्यात आली आहे. नोडल अधिकारी म्हणून अपर्णा थेटे, सहायक नोडल अधिकारी म्हणून पुष्कल शिवम यांची नेमणुक करण्यात आली आहे.

दुसऱ्या टप्प्यात यांची होणार तपासणी

दुसऱ्या टप्पयात मेडिकल दुकाने, कपड्यांची दुकाने, विविध शोरूम, इलेक्ट्रॉनिक वस्तुंची दुकाने, गॅरेजेस, पंक्चर दुरूस्तीची दुकानदारांची तसेच त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची तपासणी २५ ते ३१ जुलै या कालावधीत तपासणी करण्यात येईल. १९ जुलै ते २५ जुलै पर्यंत या दुकानदारांना त्यांची दुकाने उघडता येतील. २५ ते ३१ जुलै दरम्यान किंवा मनपा वाढवून देईल त्या कालावधीत जे दुकानदार आणि त्यांचे दुकानात काम करणारे कर्मचारी कोरोना टेस्ट करणार नाहीत, ज्यांच्याकडे कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र नसेल त्यांना दुकाने उघडता येणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *