वसंत क्लब वैजापूरतर्फे शहरात पाणपोई सुरू: नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन

वैजापूर,१५ एप्रिल  /प्रतिनिधी :-येथील वसंत क्लब वैजापूरतर्फे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात पाणपोई सुरू करण्यात आली असून या पाणपोई चे उदघाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम व नगरविकास मंत्री ना.एकनाथराव शिंदे यांच्याहस्ते शुक्रवारी झाले.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे, आ.रमेश पाटील बोरणारे, माजी नगराध्यक्ष साबेर खान, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचीन वाणी आदी या प्रसंगी उपस्थित होते.क्लबचे सचीव जफर खान व कार्यकारिणी सदस्य मेजर सुभाष संचेती यांनी एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले.

वैजापूर शहरातील वसंत क्लब या संस्थेतर्फे विविध खेळासह सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतात. सध्या तीव्र उन्हामूळे जीवाची लाही..लाही होत आहे. सध्याची गरज ओळखून या संस्थेतर्फे शहरात पाणपोई सुरू करण्यात आली आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पालकांच्या मुलींना सायकलीचे वाटप, कोरोना काळात पंतप्रधान व मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आर्थिक मदत, पुरग्रस्तांसाठी आर्थिक मदत व अन्य उपक्रम या संस्थेतर्फे राबविण्यात आले आहे.