कृषी निर्यातवृद्धीसाठी राज्याचे शेतकरी निर्यात धोरण: औरंगाबाद येथे केशर आंबा व मोसंबी क्लस्टर फॅसिलीटेशन सेल गठीत

औरंगाबाद येथे केशर आंबा व मोसंबी क्लस्टर फॅसिलीटेशन सेल गठीत

 सुनील चव्हाणभा प्र से                           

जिल्हाधिकारी, औरंगाबाद,तथा अध्यक्ष, क्लस्टर  फॅसिलिटेशन  सेल. 

भाजीपाल्याच्या उत्पादनात भारत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या तर फळांच्या उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहेमात्र दुर्दैवाने निर्यातीमध्ये २३ व्या क्रमांकावर आहेउत्पादनात अग्रेसर असलो तरी निर्यातीमध्ये मागे असल्याने हे स्थान अधिक वर नेण्यासाठी कृषि आणि पणन विभाग प्रयत्नशील आहेनिर्यात धोरणातील अनिश्चितता जागतिक बाजारपेठेत अविश्वास निर्माण करतेहे अविश्वासाचे वातावरण कमी करण्यासाठी राज्याचे निर्यात धोरण शेतकरी केंद्रित सर्वसमावेशक आखले आहेयाचा फायदा शेतकऱ्यांना होईल

        राज्यातील शेतमालाच्या निर्यातीसाठी काही वर्षांपूर्वी सर्वसमावेशक यंत्रणा नव्हतीत्यामुळे निर्यातीच्या सुविधा विस्कळित होत्यानवे निर्यात धोरणमॅग्नेटस्मार्ट प्रकल्पांच्या मोठ्या आर्थिक गुंतवणुकीमुळे निर्यात सुविधा आणि मार्गदर्शन यंत्रणा उभी राहत आहेयाचा फायदा शेतकऱ्यांच्या समूहाला होत आहेकाढणीपश्चात तंत्रज्ञान निर्यात सुविधांच्या अभावामुळे एकूण उत्पादनाच्या २५ टक्के शेतमालाची नासाडी होत आहेही आता रोखणे सोपे होणार आहेनिर्यातीवृद्धीमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला ४० ते ४५ टक्के अधिकचा दर मिळणे शक्य होणार आहे.”

        राज्यातील शेतमालाच्या निर्यातीसाठी कृषी विभाग विविध प्रयोग आणि प्रयत्न करत आहेयामध्ये विविध पिकांना भौगोलिक मानांकन मिळविणेरसायनमुक्त आणि सेंद्रिय शेतीफलोत्पादनाला चालना दिली जात आहेराज्यात फलोत्पादनामध्ये यावर्षी विक्रमी ८० हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली आहेयाचा फायदा तीन ते चार वर्षांनी प्रत्यक्ष उत्पादन सुरू झाल्यावर होणार आहेहे उत्पादन निर्यातक्षम होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत

        औरंगाबाद हे केशर आंबा  मोसंबीसाठी क्लस्टर फॅसिलिटेशन सेल जाहीर केलेले आहे.या सेलचे अध्यक्ष जिल्हयाचे जिल्हाधिकारीआहेतकेशर आंबा क्लस्टर मध्ये औरंगाबाद,बीड,अहदनगर,नाशिक,लातूर,जालनापरभणी,हिंगोली ,उस्मानाबादनांदेड अशा एकूण १० जिल्हांचा समावेश आहेतसेच मोसंबी क्लस्टर मघ्ये औरंगाबाद , जालनानागपुरजळगावअमरावतीवर्धाबीडनांदेडपरभणी अशा एकूण ९ जिल्हांचा समावेश आहे आहेत.

क्लस्टर फॅसिलिटेशन सेलची भुमिका  कार्ये

•      क्लस्टरमध्ये निर्यातक्षम मालाचे उत्पादनआंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या मागणीनुसार मालाच्या गुणवत्तेत करावयाच्या सुधारणात्याकरिता करावयाच्या उपाययोजनापायाभूत सुविधावाहतूक  इतर साधनसामुग्रीचे आधारभूत सर्वेक्षण करणे.

•      याकरिता उत्पादक शेतकरीउत्पादक कंपन्यासहकारी संस्थानिर्यातदारप्रक्रियादारइतर सेवा पुरवठादारविषयातील तज्ञशास्त्रज्ञसंबंधित विभागांचे अधिकारी समवेत चर्चा विमर्ष करुन सुधारणा / नव्याने करावयाच्या कामांची यादी तयार करणे.

•      सदर कामे खालील शिर्षकांखाली विलगीकरण करुन आराखडा तयार करणे.

प्रशिक्षणसुगीपूर्व कामेसुगीपश्चात कामे , मूल्यवृद्धी संदर्भात कामेपायाभूत सुविधामार्केंटिंग , ब्रॅंडिंग , वाहतूकसंशोधन  विकासनावीन्यपूर्ण कामे.

•      निर्यातीशी संबंधित सर्व घटकांशी समन्वय साधुन निर्यात विषयक अडी अडचणींबाबत विचार विनीमय करुन निर्यातवृद्धीच्या अनुषंगाने कामकाज करणे.

•      शेतकरी उत्पादकउत्पादकांच्या सहकारी संस्थाउत्पादकांचे संघशेतकरी उत्पादक कंपन्यानिर्यातदार ना वेळोवेळी निर्यात विषयक मार्गदर्शन करणे.

•      आवश्यकतेनुसार निर्यातविषयक प्रशिक्षण कार्यक्रमकार्यशाळाबायर – सेलर मीट चे आयोजन करणे.

•      या व्यतिरीक्त स्थानिक परिस्थिती  विशिष्ट शेतमाल लक्षत घेऊन यामध्ये आवश्यक ते घटक / बाबींचा समावेश करता येईल.

        केशर आंब्यासाठी मँगो ग्रोअर असोसिएशन  मोसंबी साठी जालना जिल्हा फळे  मोसंबी बागायतदार संघ यांना भौगोलिक मानांकन मिळाले आहेनिर्यातीसाठी रसायनमुक्त शेतमालाच्या उत्पादनापासून ते ग्राहकांपर्यंतच्या प्रवासावर देखरेखीची यंत्रणा उभारण्यात येत आहेजागतिक बाजारपेठेत कोणता शेतमाल पाहिजे यांच्या मार्गदर्शनासाठी शेतकरी आणि निर्यातदार यांच्यात सुसंवाद साधत प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

        क्लस्टर सेल मधील समाविष्ठ जिल्हयातील केशर आंबा  मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी  भौगोलिक मानांकन  मँगो नेट / सिट्रस नेट या संकेत स्थळांवर ऑनलाईन नोंदणी करून कृषिमाल निर्यात धोरणाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेता येईल.

        केशर अंबा उत्पादक शेतक-यांना जी आय नोंदणी व निर्यात प्रक्रीयाबाबत माहिती होण्यासाठी दि.16/04/2022 रोजी देवगिरी महाविध्यालयातील सभागृहात सकाळी 11.30वा.कार्यशाळा आयोजित केलेली आहे.तरी .केशर आंबा उत्पादक शेतक-यांनी कार्यशाळेस उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

 तसेच अधिक माहितीसाठी कृषि विभाग किंवा पणन विभाग येथे भेट देऊ शकता.