बोरसर येथे शिवसेना व जे.के.मित्रमंडळातर्फे मोफत रोगनिदान व नेत्र चिकित्सा शिबीर

वैजापूर,१२ एप्रिल  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील मौजे बोरसर येथे शिवसेना व जे. के. जाधव मित्र मंडळ वैजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत रोगनिदान व नेत्र चिकित्सा शिबिराचे उदघाटन आ.रमेश पाटील बोरणारे यांच्याहस्ते मंगळवारी झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते जे.के.जाधव होते. माजी नगराध्यक्ष साबेर खान, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुकाप्रमुख सचीन वाणी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रामहरीबापू जाधव यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.लायन्स क्लब ऑफ चिकलठाणा,आनंद हॉस्पिटल वैजापूर,, जे. जे. प्लस हॉस्पिटल औरंगाबाद या रुग्णालयांनी या शिबिरात सहभाग नोंदवला. शिबिरात रुग्णांची तपासणी करून उपचार व सल्ला देण्यात आला.


याप्रसंगी उपतालुकाप्रमुख गोकुळ पाटील आहेर, बाबासाहेब राऊत, रमेशअण्णा पवार, माजी पंचायत समिती सदस्य अरूण होले, बाळासाहेब चेळेकर, सरपं सुमीद्राबाई अंबिलके, प्रभाकर सोनवणे, काकासाहेब गायकवाड, संजय पवार, अरविंद शेवाळे, विलास नाना पवार, आत्माराम गायकवाड, राजेश मुंगी, भावराव पवार, सुनिल बोडखे, सूर्यकांत पवार, पंकज भाऊ साळुंके, रामेश्वर साळुंके , बाबासाहेब पवार, राहुल शेवाळे, सागर हुमे, नवनाथ गायके, बत्तासे दादा, गुलाबराव पवार यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.