वैजापूर -गंगापूर चौफुलीचे महात्मा ज्योतिराव फुले चौक नामकरण ;मंत्री भुजबळ यांच्या हस्ते फलकाचे अनावरण

वैजापूर,११ एप्रिल  /प्रतिनिधी :- थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून वैजापूर- गंगापूर चौफुलीला महात्मा ज्योतिराव फुले असे नाव आज देण्यात आले.राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ यांच्याहस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
आ. रमेश पाटील बोरणारे, माजी नगराध्यक्ष साबेर खान, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव पवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील सदाफळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव निंबाळकर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष काशीनाथराव गायकवाड, अजय पाटील  चिकटगांवकर, सरपंच कविता दौलतराव गायकवाड, उपसरपंच मीना पेहरकर, दौलतराव गायकवाड, सजनराव गायकवाड आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले हे भारतीय सामाजिक क्रांतीचे जनक होते. आधुनिक महाराष्ट्राच्या जडण घडणीत महात्मा फुले व राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य अत्यंत मोलाचे व पूरक होते असे भुजबळ याप्रसंगी बोलताना म्हणाले. आजच्या युवकांनी नौकरी न मिळाल्याने हताश -निराश होण्याची गरज नाही, कुठलाही उद्योग-व्यवसाय उभा करून त्यातून रोजगार मिळवावा व स्वावलंबी व्हावे.पूरक उद्योग असेल तरच शेती व्यवसाय परवडेल असा सल्लाही महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा अ.भा.महात्मा फुले समता परिषदचे संस्थापक अध्यक्ष छगनराव भुजबळ यांनी पुढे बोलताना दिला. कार्यक्रमास सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.